JOIN US
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / 'या' पर्यटनस्थळी महिला बिकिनीमध्ये दिसल्यास भरावा लागणार 40 हजार रुपयांचा दंड

'या' पर्यटनस्थळी महिला बिकिनीमध्ये दिसल्यास भरावा लागणार 40 हजार रुपयांचा दंड

या शहरांच्या रस्त्यांवर जर कुणी बिकिनी घालून फिरताना आढळलं किंवा शर्टलेस फिरताना दिसलं तर त्याला भारतीय रुपयांप्रमाणे तब्बल 40 हजार रुपयांपर्यंतचा दंड (Penalty)ठोठावला जाऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जुलै : पर्यटनाला (tourism)म्हणजे फिरायला गेल्यावर जरा फंकी किंवा नेहमीपेक्षा वेगळे कपडे (Beach Clothes) घालणं स्वाभाविक आहे. त्यातही समुद्रकिनारा असलेल्या पर्यटनस्थळी गेल्यावर तर बिचला शोभेल असेच कपडे घालणं अनेकजण पसंत करतात. पण तुम्ही फिरायला गेला आहात म्हणून कसेही कपडे घालून ‘या’ शहराच्या रस्त्यांवर फिरलात तर तुम्हाला दंड होऊ शकतो. आज तकच्या वेबसाईटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. हे स्थळ आहे इटलीतील (Italy) Pompeii आणि Naples. इथं येणाऱ्या पर्यटकांना आता ‘ड्रेस कोड’चं पालन करावंच लागणार आहे. Pompeii आणि Naples चे समुद्रकिनारे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे दरवर्षी इथं जगभरातील हजारो पर्यटकांची गर्दी होते. बिचेस असल्याने साहजिकच इथे बिकिनीवर अनेक महिला पर्यटकही फिरताना दिसतात; पण अनेकदा शहराच्या रस्त्यांवरही या महिला पर्यटक बिकिनीजमध्ये (Bikini) आणि पुरुष शर्टलेस फिरताना दिसतात. त्यामुळे या शहरांतील नागरिकांनीच आक्षेप घेतला आहे. आता या शहरांच्या रस्त्यांवर जर कुणी बिकिनी घालून फिरताना आढळलं किंवा शर्टलेस फिरताना दिसलं तर त्याला भारतीय रुपयांप्रमाणे तब्बल 40 हजार रुपयांपर्यंतचा दंड (Penalty)ठोठावला जाऊ शकतो. हेही वाचा - उंटाची जोडी असलेली मूर्ती म्हणून घरात ठेवतात लोक; नोकरी-धंद्यात असा होतो फायदा इथल्या समुद्रकिनारी सुट्टी घालवायला हजारो पर्यटक येतात. ते अनेकदा कमी कपडे घालतात आणि ’अशोभनीय वर्तन’ करतात. त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्रास होतो. त्यामुळे इथल्या स्थानिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली. या तक्रारीची तिथल्या महापौरांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. इथं बिचेसवर येणाऱ्या पर्यटकांना आता सक्त ताकीद देण्यात आली आहे. जर कुणी ‘कमी कपड्यांत अशोभनीय वर्तन’ करताना आढळलं तर त्यांना 425 पाउंड्स (40 हजार रुपयांपेक्षाही जास्त) दंड ठोठावला जाऊ शकतो. पर्यटकांच्या अशा वागणुकीमुळे समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या शहराची ‘प्रतिष्ठा’ आणि ‘जगण्याचा दर्जा’ या दोन्हीला धक्का बसतो. या नियमांचे पालन केलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी समुद्रकिनारे आणि रस्त्यांवरही पोलीस अधिकारी गस्त घालणार आहेत. शर्टलेस किंवा स्विमिंग कॉश्च्युम्समध्ये आढळणाऱ्या लोकांना दंड ठोठावला जाईल. या पर्यटन स्थळांवर मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. बिचेसवर ते जसे फिरतात त्याच कपड्यांमध्ये किंवा काहीजण तर उघडेच रस्त्यांवरही फिरतात. इथल्या काही लोकांना ते विचित्र वाटतं.अशा प्रकारचे नियम यापूर्वीही काही बिच एरियामध्ये लावण्यात आल्याचं एका स्थानिक पत्रकाराने सांगितलं. तेव्हा तुम्ही यापुढे कधी सुट्टी एन्जॉय करायला जाल तेव्हा बिच कॉश्च्युममध्ये तिथल्या रस्त्यांवर फिरण्याची चूक करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या