JOIN US
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / घरंगळत येणारा मोठा दगड बाईकवर आदळला, तेव्हा वाटलं संपलं सगळं! Bike Rider म्हणतो..

घरंगळत येणारा मोठा दगड बाईकवर आदळला, तेव्हा वाटलं संपलं सगळं! Bike Rider म्हणतो..

आमच्याकडे पुढे जाण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. अखेर 45 किलोमीटर बाईक चालवत आम्ही हॉटेलवर पोहचलो होतो. थंडी इतकी वाजत होती की गाडीच्या इंजिन आणि सायलेन्सरला हात लावल्यानंतरही काही जाणवत नव्हतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लेड लडाख राईड होती. आतापर्यंतचा प्रवास मस्त झाला होता. त्यामुळे सगळेजण एका लयीत बाईक चालवत होते. अचानक मोठा आवाज झाला, आमचं लक्ष तिकडं जाईपर्यंत एक भला मोठा दगड आमच्या दिशेने वेगाने घरंगळत येताना दिसला. वेग इतका होता की पापणी लवायच्या आत तो खाली पोहचला. अन् दणदिशी गाडीवर आदळला… प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. हाय फ्रेड्स मी जिग्नेश लालजी पटेल.. बाईक रायडींगचा नाद मला अगदी लहानपणापासूनच होता. मी लहान असताना बाईकवर मागे बसण्यापेक्षा पुढे टाकीवर बसायचो. कारण, बाईक कशी चालवतात, कुठली गोष्टी कशी वापरतात, अशा सर्व गोष्टी मला शिकायच्या होत्या. त्यातही पुढे बसल्यानंतर जो वारा केसांमध्ये शिरायचा, भारी फिलिंग होतं. एव्हढं सगळं करत असल्याने मला कोणी बाईक शिकवण्याची गरज पडली नाही. मी बाईकवर एका पायाचा पंजा खाली टेकून बसायचो. कारण, त्यावेळी दोन्ही पाय टेकत नव्हते. हा, पण गाडी मीच माझी शिकलो. माझी एक क्लास मेट होती, मी रोज दुपारी शाळा सुटल्यानंतर तिच्या घरी जायचो. तिच्या पप्पांकडे बजाजची चेतक स्कूटर होती. आम्ही ती गुपचूप घेऊन जायचो. पूर्ण पेट्रोल संपेपर्यंत गाडी सोडत नव्हतो. आजही तो किस्सा आठवला की हसायला येतं. आयुष्याची वीण आणखी घट्ट झाली स्वतःची बाईक घेतल्यानंतर तर विषयच नव्हता. बाईक रायडींगसाठी पाहिलेली सर्व स्वप्न पूर्ण करण्याचा जणू विडाच उचलला. सोलो असो की ग्रुप रायडींग मला फारसा फरक पडत नाही. मला फक्त बाईख रायडींग हवं असतं. मी त्या काळात भरपूर ठिकाणी फिरलो असेल. जवळपास सर्वच ऋतूमध्ये फिरण्याचा अनुभव घेतला. पुढे लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोलाही बाईक रायडींगची हौस असल्याचं समजलं. ऐकमेकांना साजेसे असल्याने आमची मैत्री आणखी घट्ट झाली. त्यामुळे लग्नानंतर अनेक राईड्स आम्ही एकाच बाईकवर केल्या आहेत. आजही आम्हाला कुठे जायचं म्हटलं की आधी बाईकचा विचार मनात येतो. बाईकने जाणं शक्य नसेल तरच आम्ही फोरव्हिलर निवडतो. आयुष्यातील आनंदाचा क्षण मी असंख्य बाईक रायडींग केल्या आहेत. सुदैवाने अद्यापतरी मला कुठे अडचण आली नाही. मी देवाकडे प्रार्थना करतो की भविष्यात देखील येऊ नये. माझ्या बाईक रायडींगच्या प्रवासातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे स्वतःच्या कमाईने घेतलेली पहिली बाईक. मी 2009 ते आतापर्यंत 4 बाईक बदलल्या आहेत. माझी पहिली बाईक बजाज पल्सर 180 सीसी होती. त्यानंतर रॉयल एनफिल्डची क्लासिक 350, बजाज डॉमीनर 400 आणि आता पुन्हा रॉयल एनफिल्डची हिमालयन घेतली आहे. थोडक्यात वाचलो.. माझा लडाखचा प्रवास खूप संघर्षपूर्ण राहिला. जेव्हा तुम्ही हिमालयात गाडी चालवत असता, त्यावेळी खूप सावध असणं गरजेचं असतं. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आम्ही राईड करत होतो, गाडीचा वेग साधारण 90 किमीच्या आसपास असेल. एक भलामोठा दगड दाणदाण करत खाली घरंगळत येत माझ्या बाईकवर आदळला. मी बाईक कशीबशी सावरली. माझ्या सुदैवाने मला काहीच झालं नाही. गाडीचं नुकसान झालं. तशा परिस्थितीत गाडी आम्ही खालीपर्यंत घेऊन आणली. त्यानंतर जेव्हा आम्ही पँगोंग सरोवरकडे जात होतो. तेव्हा अचानक पाचसहा सकेंद मोठा वारा आला. तो इतका वेगवान होता की आमच्या बाईकसुद्धा पुढे जाईनात. तिथून थोडे पुढे सरकलो नाही तोच जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही पुरते भिजलो. आधीच तापमान 5 अंश सेस्लिअसच्या आसपास त्यात पावसात भिजल्याने कुडकुडायला लागलो. हाताला वांबा यायल्या लागल्या. काय करावं काही सुचेना. पण, आमच्याकडे पुढे जाण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. अखेर 45 किलोमीटर बाईक चालवत आम्ही हॉटेलवर पोहचलो होतो. थंडी इतकी वाजत होती की गाडीच्या इंजिन आणि सायलेन्सरला हात लावल्यानंतरही काही जाणवत नव्हतं. आमची त्वच्या बधीर झाली होती. रुममध्ये गेल्यानंतर कमीतकमी 1 तास जॅकेट आणि ब्लँकेट घेऊन झोपलो होतो. सर्वात आधी मी माझ्या बजाज पल्सर वर बायकोसोबत माझ्या नवसारी या गावाला गेलो होतो. तेव्हापासून आजतागायत माझा प्रवास सुरुच आहे. मी आतापर्यंत गोवा, सुरत, अहमदाबाद, वडोदरा, बोटाड, राजुला, लोणावळा, पवना, नाशिक, शिर्डी, लेह लडाख अशा अनेक राईड केल्या आहेत. आता आगामी काळात मी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, 12 ज्योतिर्लिंग आणि भारताच्या उत्तर-पूर्वेला प्रवास करणार आहे. - जिग्नेश लालजी पटेल, बाईक रायडर, विरार तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या