मुंबई, 27 ऑगस्ट : देशातील युवावर्ग फिटनेसला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देताना दिसतो. यामुळे युवकांमध्ये फिटनेस बॅण्डची (Fitness Band) मोठी क्रेझ आहे. सध्या भारतातील बाजारपेठांमध्ये वैविध्यपूर्ण फिचर्स असलेले फिटनेस बॅण्ड उपलब्ध आहेत. अनेक कंपन्यांचे हे फिटनेस बॅण्डस युजर्सच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताहेत. त्यातच शाओमी (Xiaomi) या चिनी कंपनीने भारतीय बाजारात नुकताच Mi Band 6 हा नवा फिटनेस बॅण्ड लॉन्च केला आहे. शाओमीने हा फिटनेस बॅण्ड काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये लॉन्च केला होता. त्यानंतर त्यात काही बदल करुन आता हा फिटनेस बॅण्ड भारतात सादर करण्यात आला आहे. आधुनिक फिचर्स असणारा हा फिटनेस बॅण्ड युजर्सच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा कंपनीला आहे. शाओमीचा Mi Band 6 हा बहुप्रतिक्षित फिटनेस बॅण्ड नुकताच भारतात लॉन्च झाला आहे. शाओमीने या Mi Band 6 ची किंमत 3,499 रुपये ठेवली असून कमी बजेटमध्ये आधुनिक फिचर्स असलेला फिटनेस बॅण्ड खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. शाओमीच्या अधिकृत वेबसाईट mi.com सह अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर (Flipcart) हा फिटनेस बॅण्ड उपलब्ध असेल. मात्र कंपनीने या बॅण्डची विक्री सुरु होण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. Mi Band 6 चे फिचर्स या फिटनेस बॅण्डमध्ये 1.56 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. जुन्या व्हर्जनच्या तुलनेत हा डिस्प्ले 50 टक्क्यांनी मोठा आहे. यात एज-टू-एज डिझाईन उपलब्ध आहे. याच्या मदतीने कंपनीने मोठा डिस्प्ले जुन्या साइजमध्येच फिट केला आहे. या डिस्प्लेचे (Display) रिझोल्युशन 152 बाय 486 पिक्सल्स आहे. यात 326 ppi पिक्सल्स डेंसिटीही देण्यात आली आहे. डिस्प्लेत 450 नीटसपर्यंत ब्राईटनेस मिळणार असून, त्याच्या प्रोटेक्शनसाठी टेंपर्ड ग्लास आणि अॅण्टी फिंगरप्रिंट कोटींगही देण्यात आले आहे. यात spO2 सेंसर, 30 एक्सरसाइज मोड, स्लीप ट्रॅकिंग, स्लीप ब्रिदिंग क्वॉलिटीसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. या फिटनेस बॅण्डमध्ये Mi 5 प्रमाणेच 24 बाय 7 हार्ट रेट मॉनिटरिंग होते. यात 6 ऑटोमॅटिक डिटेक्शनसह 30 एक्सरसाईज मोड (Exercise Mode) देण्यात आले आहे. Mi Band 6 5 ATM पर्यंत वॉटर रेझिस्टंटसह आहे. यात 125 mAh Li po बॅटरी देण्यात आली असून, ती सिंगल चार्जमध्ये 14 दिवसांपर्यंत चालते. ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंगसाठी spO2 सेन्सर यात देण्यात आला आहे. हा बॅण्ड 5.0 ब्लुटुथ कनेक्टिव्हिटी सह आहे. हा बँड अॅण्ड्राईड (Android) 5.0 आणि आयओएस (iOS) 10 वर काम करणाऱ्या कोणत्याही डिव्हाईसला जोडता येणार आहे.