JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / फक्त 1 रुपयात एक जीबी डेटा, जिओला टक्कर देतेय 'ही' कंपनी

फक्त 1 रुपयात एक जीबी डेटा, जिओला टक्कर देतेय 'ही' कंपनी

रिलायन्स जिओ इतर टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट, कॉलिंगच्या सुविधा पुरवते. आता बेंगळुरूतील एका कंपनीने फक्त 1 रुपयात 1 जीबी डेटा देण्यास सुरुवात केली आहे.

0106

रिलायन्स जिओ इतर टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट, कॉलिंगच्या सुविधा पुरवते. आता बेंगळुरूतील एका कंपनीने फक्त 1 रुपयात 1 जीबी डेटा देण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरात
0206

जिओला टक्कर देणारी ही कंपनी 2017 पासून सेवा देत आहे. Wifi Dabba नावाची ही कंपनी 2017 मध्ये 20 रुपयांत एक जीबी डेटा देत होती.

जाहिरात
0306

कंपनीचे फक्त तीन प्लॅन आहेत. यामध्ये दोन रुपयांना एक जीबी डेटा, 10 रुपयांना 5 जीबी डेटा आणि 20 रुपयांना 10 जीबी डेटा दिला जातो. यासाठी एक दिवसाची मुदत असेल.

जाहिरात
0406

Wifi Dabba कंपनीने चहासह स्थानिक दुकानात त्यांचे वायफाय राउटर लावले आहेत. याच्या माध्यमातून 20 किमी परिसरात 100 जीबी प्रतिसेकंद स्पीडने इंटरनेट पुरवले जाते. त्यांची स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

जाहिरात
0506

आता कंपनी ही सेवा लोकांच्या घरापर्यंत पोहचवण्याच्या तयारीत आहे. कंपनीने वायफायसाठी कोणतीही केबल टाकलेली नाही तसेच सरकारकडून स्पेक्ट्रमची खरेदीही केली नाही.

जाहिरात
0606

कंपनीला फक्त राउटरचा खर्च येतो. त्यामुळे डेटा स्वस्तात पुरवला जाते. यासाठी कंपनीने स्वत:चे नेटवर्क तयार केलं आहे. सध्या काही ठराविक ठिकाणीच ही सेवा पुरवली जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या