JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता अधिक सुरक्षित होणार WhatsApp, Cyber Fraud ची एक्सटेंशनद्वारे मिळेल माहिती

आता अधिक सुरक्षित होणार WhatsApp, Cyber Fraud ची एक्सटेंशनद्वारे मिळेल माहिती

व्हॉट्सअ‍ॅपनं आता आपलं वेब अ‍ॅप अधिक सुरक्षित करण्यासाठी एक नवीन एक्सटेंशन (Extension) आणलं आहे. या एक्सटेंशनच्या मदतीने युजर्स सायबर हल्ल्यांपासून स्वतः चं संरक्षण करू शकतील. या एक्सटेंशनला कोड व्हेरिफाय (Code Verify) असं म्हटलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 मार्च : व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग (WhatsApp) App आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं फक्त मेसेजच नाही तर ऑडिओ (Audio), व्हिडीओ (Video) आणि फोटोचीही (Photos) अगदी सहजपणे देवाण-घेवाण करता येते. मेटाच्या (Meta) मालकीचं असलेलं व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सला सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतं. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपनं जेव्हापासून मल्टी-डिव्हाइस कॅपेबिलिटी फीचर (Multi-device Capability Feature) लाँच केलं आहे, तेव्हापासून बरेच युजर्स थेट वेब ब्राउझरच्या (Web Browser) माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहेत. म्हणूनच व्हॉट्सअ‍ॅपनं आता आपलं वेब अ‍ॅप अधिक सुरक्षित करण्यासाठी एक नवीन एक्सटेंशन (Extension) आणलं आहे. या एक्सटेंशनच्या मदतीने युजर्स सायबर हल्ल्यांपासून स्वतः चं संरक्षण करू शकतील. या एक्सटेंशनला कोड व्हेरिफाय (Code Verify) असं म्हटलं जात आहे. जीएसम अरेना (GSM Arena) या टेक वेबसाईटच्या मते, व्हॉट्सअ‍ॅपचं वेब व्हर्जन पुरेशा प्रमाणात सुरक्षित करण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचललं आहे. वेब अ‍ॅप्स हे हल्ल्यांविरुद्ध कमी फ्लेक्झिबल असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. कोड व्हेरिफाय एक्सटेंशनमुळे युजर्सला, विंडोज (Windows), आयओएस (iOS) किंवा अँड्राईडवरील (Android) मूळ अ‍ॅप सारखीच सुरक्षितता मिळू शकते. लाईव्ह हिंदुस्ताननं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटाइन्फोनुसार (WABetaInfo), कोड व्हेरिफाय हे एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं वेब ब्राउझर एक्सटेंशन आहे. या एक्सटेंशनमुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला सिक्युरिटीची आणखी एक लेअर मिळते. जेव्हा कोड व्हेरिफाय इन्स्टॉल केलं जातं, तेव्हा तुम्ही वापरत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप वेब व्हर्जनचा कोड एखाद्या मॅलेशियस कोडने (Malicious Code) रिप्लेस केलेला आहे की नाही याचा तत्काळ शोध घेतं. याच्या मदतीने ऑथेंटिक आणि अनटेंपर्ड व्हर्जनची ओळख पटवता येऊ शकते. मेटाच्या अधिकृत पोस्टनुसार, ‘व्हेरिफाय हे सबरिसोर्स इंटिग्रिटीच्या (Sub resource Integrity) संकल्पनेचा विस्तार करतं. हे सिक्युरिटी फीचर, वेब ब्राउझरला व्हेरिफाय करण्याची परवानगी देतं. यामुळे त्यांना मिळालेल्या रिसोर्सेसमध्ये फेरफार तर झालेला नाही ना? याचा शोध घेता येऊ शकतो. सबरिसोर्स इंटिग्रिटी फक्त सिंगल फाइल्सवर (Single Files) कार्य करतं मात्र, कोड व्हेरिफाय संपूर्ण वेबपेज रिसोर्सेसला व्हेरिफाय करतं.

हे वाचा -  WhatsApp Forward वर आता येणार आणखी बंधनं! तुमच्या वापरावर असा होणार परिणाम

ही बाब मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आणि प्रक्रियेवर विश्वास वाढवण्यासाठी, कोड व्हेरिफाय हे एक्सटेंशन क्लाउडफ्लेयरसह (Cloudflare) थर्ड पार्टी घटक म्हणून काम करणार आहे. ‘आम्ही क्लाउडफ्लेयरला व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या जावा स्क्रिप्ट (JavaScript) कोडसाठी एक क्रिप्टोग्राफिक हॅश स्त्रोत प्रदान केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कोड व्हेरिफाय वापरतं, तेव्हा एक्सटेंशन आपोआप व्हॉट्सअ‍ॅप वेबवर चालणाऱ्या कोडची व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हेरिफाय केलेल्या आणि क्लाउडफ्लेयरवर प्रकाशित केलेल्या कोडच्या व्हर्जनशी तुलना करतं. त्यात कोणताही दोष आढळल्यास, कोड व्हेरिफाय युजरला वॉर्निंग देण्याचं काम करतं,’ असं कंपनीनं म्हटलं आहे. ज्या फाईल्समध्ये फेरफार झाला आहे त्या शोधण्यासाठी हॅशशी तुलना करणं ही काही नवी बाब नाही. कोड व्हेरिफाईड क्लाउडप्लेअरच्या थर्ड पार्टी व्हेरिफिकेशनच्या मदतीने फेरफार केलेल्या फाईल्स आपोआप शोधता येतात. रिअल-टाइम कोड व्हेरिफिकेशन (Real-time Code Verification) प्रदान करण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅप सिक्युरिटी प्रोटेक्शन, कोड व्हेरिफिकेशन एक्सटेंशन आणि क्लाउडफ्लेअर हे सर्व एकत्र काम करतात. जेव्हा-जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी कोड अपडेट केला जातो, तेव्हा सत्य आणि एक्सटेंशनचा क्रिप्टोग्राफिक हॅश सोर्सदेखील ऑटोमॅटिकली अपडेट होईल.

हे वाचा -  WhatsApp वर मेसेज चुकून डिलीट झाला? असा मिळेल परत, पाहा काय आहे प्रोसेस

व्हॉट्सअ‍ॅप बीटाइन्फोच्या रिपोर्टनुसार, ‘जेव्हा कोड व्हेरिफाय यशस्वीपणे व्हेरिफिकेशन करतं याचा अर्थ असा की तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वेबचं ऑथेंटिक व्हर्जन (Authentic Version) वापरत आहात. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये हॅकर्स (Hackers) किंवा इतर सायबर क्रिमिनल्सचा शिरकाव झालेला नाही, हे लक्षात येतं. कोड व्हेरिफाय हे तुम्ही वापरत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप वेब व्हर्जनची सुरक्षितता तपासण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे’. या व्यतिरिक्त, एक्सटेंशन मेटाडेटा व युजर मेसेज लॉग करत नाही आणि ते व्हॉट्सअ‍ॅप व मेटासह कोणतीही माहिती शेयर करत नाही. हा एक ओपन सोर्स आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्याचा वापर करू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या