Whatsapp Status: पंढरपूरचा विठ्ठल (Lord Vitthal) म्हणजे उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत. आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांसह सर्वांनाच असते. दरवर्षी आषाढी वारीमध्ये (Aashadhi Vari) लोटलेला अथांग जनसागर विठुरायाच्या भक्तीत न्हाऊन निघतो. आपण आपल्या मोबाईल स्टेटसला नेहमीच सुंदर सुंदर स्टेटस ठेवतो. आषाढी वारीच्या निमित्ताने तुम्ही विठूरायाचे सुंदर स्टेटस ठेवू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी सुंदर स्टेटस घेऊन आलो आहोत, ते तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेऊ शकता.