JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर मिळणार सर्वात मोठं फीचर, ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी ठरणार महत्वाचं

WhatsApp वर मिळणार सर्वात मोठं फीचर, ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी ठरणार महत्वाचं

व्हिडिओ कॉलिंगसाठी व्हॉटसअॅप लवकरच नवं फीचर लाँच करण्याची तयारी करत आहे.

जाहिरात

पण click to chat केल्यानं आपली माहिती गुगलमध्ये दिसते याबद्दल वापरकर्त्यांना कोणतीही माहिती नाही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे : व्हॉटसअॅप युजर्सना आता नवीन फीचर मिळणार आहे. यामधून व्हिडिओ कॉलिंगमध्ये युजर्सना चांगला अनुभव मिळेल. व्हॉटसअॅप सध्या मेसेंजर रूम्सची टेस्टिंग करत आहे. हे वेब व्हर्जनसाठी उपलब्ध असेल. WABetaInfo ने ट्वीट करून सांगितलं की, येत्या काळात व्हॉटसअॅप वेबवर मेसेंजर रूम्सचं फीचर दिलं जाईल. ज्यामधून 50 लोकांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येईल. मेसेंजर रूम्स एक असं फीचर आहे ज्यामध्ये प्रायव्हेट लिंक शेअर करून व्हिडिओ कॉलिंग करता येईल. एवढंच नाही तर जे लोक फेसबुक वापरत नाहीत त्यांनाही व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होता येईल. फेसबुकने जाहीर केलं आहे की, व्हॉटसअॅपमध्ये एक शॉर्टकट दिला जाईल ज्याचं अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.20.139 वर टेस्टिंग सुरू केलं आहे. लवकरच हे फीचर iOS अॅपसाठी दिलं जाईल. मात्र याचा शॉर्टकट सध्या व्हॉटसअॅप वेबसाठी देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

व्हॉटसअॅप वेबवर मेसेंजर रूमचा शॉर्टकट Attach च्या ऑप्शनमध्ये मिळेल. तो सिलेक्ट केल्यानंतर युजरला इंट्रोडक्शन पर्याय दिसेल. याशिवाय मेसेंजर रूमचा दुसरा पर्याय मेन मेन्यूमध्ये दिला जाईल. युजर्सना ‘new group’, ‘Archeived’ ‘Starred’ पर्याय जिथं दिले जातात त्याच ठिकाणी हा ऑप्शन मिळेल. मेसेंजर रूम क्रिएट करताना व्हॉटसअॅप तुम्हाला मेसेंजर ओपन करण्यासाठी विचारते. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. अद्याप हे कधी लाँच करण्यात येईल हे सांगण्यात आलेलं नाही. मात्र लवकरच हे WhatsApp Web शिवाय iOS, अँड्रॉइडसाठी उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. हे वाचा : फेसबुकने बदललं डिझाइन, Whatsapp नंतर पहिल्यांदाच दिलं ‘हे’ फीचर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या