JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp New Update : तुमच्या परवानगीशिवाय आता 'हे' होणारच नाही, व्हॉट्सअ‍ॅपचं नवं अपडेट

WhatsApp New Update : तुमच्या परवानगीशिवाय आता 'हे' होणारच नाही, व्हॉट्सअ‍ॅपचं नवं अपडेट

व्हॉट्सअ‍ॅप आता पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलं आहे. या अपडेटचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

जाहिरात

बँक अकाउंट हटवायचं असल्यास सर्वात आधी WhatsApp ओपन करा आणि वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. इथे Payment पर्यायावर क्लिक करा. आता बँक अकाउंटची एक लिस्ट दिसेल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 एप्रिल : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मेसेंजर अ‍ॅपने यूजर्संच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग आता प्रायव्हेट चॅटसोबतच ऑफिशिअल कॉन्व्हरसेशनसाठीदेखील होत असतो. सध्याच्या काळात मित्र असो, नातेवाईक असो किंवा सहकारी सर्वांशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सर्वांत सोपं आणि सहज वापरता येईल, असं माध्यम झालं आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग करून आता केवळ मेसेज आणि व्हिडिओ कॉलच करता येत नाहीत. तर बँकिंग व्यव्हार करण्याची सुविधादेखील व्हॉट्सअ‍ॅपने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हे अ‍ॅप्लिकेशन अनेकांसाठी महत्त्वाचं ठरलं आहे. आणि त्यामुळेच त्याची मालक कंपनी मेटा यूजर्सना उत्तम अनुभव देण्यासाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट घेऊन येत असते. मेटाच्या मालकीचे हे व्हॉट्सअ‍ॅप आता पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइडवर (Android) डिसअपिअरिंग चॅटसाठी (Disappearing Chat) ‘मीडिया व्हिजिबिलिटी’ (Media Visibility) हा ऑप्शन बंद करत आहे. या नव्या अपडेटमुळे फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर ते आपोआप गॅलरी किंवा कॅमेरा रोलमध्ये सेव्ह होणार नाहीत. हे फीचर डिसअपिअरिंग मेसेजसाठी असेल. उदाहरणार्थ जर तुम्हाला कोणी मेसेज किंवा डिसअपिअरिंग फीचरसह फोटो किंवा व्हिडिओ पाठवला, तर तुम्हाला तो स्वतः सेव्ह करावा लागेल, तरच तो तुमच्या फोनमधील गॅलरीत दिसेल. याबद्दलचं सविस्तर वृत्त ‘झी न्यूज हिंदी’नं प्रकाशित केलं आहे. ‘असं’ काम करेल नवीन अपडेट WABetainfo नुसार, व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर डिसअपिअरिंग चॅटसाठी मीडिया व्हिजिब्लिटी ऑप्शन ऑटोमॅटिकली बंद करत आहे. यानंतर रिसीव्हरच्या फोन गॅलरीमध्ये फोटो दिसणार नाहीत. असं केल्यामुळे डिसअपिअरिंग मेसेज फीचर वापर अधिक सुरक्षित आणि खाजगी होऊ शकेल. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, अँड्रॉइडच्या काही व्हर्जन्सवर काही यूजर्सकडे आधीच मीडिया मॅन्युअली सेव्ह करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅप आयओएस (iOS) यूजर्ससाठीदेखील हा बदल करत आहे. यामुळे आयफोनवरील डिसअपिअरिंग चॅटसाठी सेव्ह टू कॅमेरा रोलचा (Save to Camera Roll) पर्याय दिसणार नाही. ( राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता, फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक ) ड्रॉईंग टूलही केले लाँच नवीन अपडेटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने ड्रॉईंग टूल्स (Drawing Tool) (नवीन पेन्सिल आणि ब्लर टूल्स) दिली आहेत. आयओएस (IOS) युजर्ससाठी ब्लर टूल आधीच आली आहेत. त्यानंतर आता ते अँड्रॉइडवरसाठीदेखील उपलब्ध करण्यात आलं आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरून व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट केलं असेल तर तुम्ही ड्रॉईंग टूल वापरू शकता. दरम्यान, या नव्या फीचर्सचा ग्राहकांना भरपूर फायदा होतो. ते आवडीने ही फीचर्स वापरतात किंवा पसंत पडली नाहीत तर वापरतही नाहीत. कंपनी मात्र यावर लक्ष ठेवून असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या