JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार! वाचा तुम्हाला कधी मिळणार नवीन फिचर

आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार! वाचा तुम्हाला कधी मिळणार नवीन फिचर

मेसेजिंग अ‍ॅप एका नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे जे बीटा टेस्टर्सला 2GB पर्यंत फाइल्स पाठवण्याचे फिचर देईल. हे नवीन वैशिष्ट्य Android आणि iOS दोन्हीसाठी असेल. WhatsApp ची नवीन फाइल मर्यादा आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण लोक हाय मेगापिक्सेल लेन्स वापरत आहेत जे हाय रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ तयार करतात ज्याची साईज मोठी असते.

जाहिरात

बँक अकाउंट हटवायचं असल्यास सर्वात आधी WhatsApp ओपन करा आणि वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. इथे Payment पर्यायावर क्लिक करा. आता बँक अकाउंटची एक लिस्ट दिसेल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मार्च : सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. आता मेसेजिंग अ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे बीटा टेस्टर्सना 2GB पर्यंत फाइल्स पाठवता येतील. हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्हींसाठी उपलब्ध असेल. सध्या हे फिचर अर्जेंटिनामध्ये सुरू करण्यात आले असून, ते इतरत्र कधी येणार याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एका विशिष्ट आकारापर्यंत मीडिया फाइल्स शेअर करण्याची परवानगी देतात. व्हॉट्सअ‍ॅपची नवीन फाइल मर्यादा आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण, लोक हाय मेगापिक्सेल लेन्स वापरत आहेत असल्याने हाय रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ तयार करतात जे आकाराने मोठे असतात. ते पाठवण्‍यासाठी, लोकांना सहसा ते अॅप-मधील किंवा थर्ड-पार्टी अॅपद्वारे कमी किंवा संपादित करावे लागते. मीडिया फाइल काँम्प्रेस केल्याने क्वालिटी देखील खराब होते आणि रिझल्टवर परिणाम होतो. Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, Aadhaar Link बाबत मोठी घोषणा सध्या 100MB पर्यंत फाईल्स शेअर करता येतात WhatsApp सध्या 100MB पर्यंतच्या मीडिया फाइल्स अॅपद्वारे पाठवण्याची परवानगी देते. परंतु, या नवीन अपडेटसह, इन्स्टंट-मेसेजिंग अॅप वापरकर्ते कोणत्याही अडचणी शिवाय 2GB पर्यंतच्या फाइल्स पाठवू शकतात. व्हॉट्सअॅप ट्रॅकर, WABetaInfo, म्हणते की हे नवीन वैशिष्ट्य अर्जेंटिनामधील काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. अंतिम रोलआउटमध्ये बदल होऊ शकतो किंवा WhatsApp फक्त सध्याची 100MB मर्यादा ठेवू शकते आणि 2GB फाइल्सची कल्पना वगळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या