JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Work From Home साठी फायदेशीर ठरेल WhatsApp चं हे फिचर, काय आहे घ्या जाणून

Work From Home साठी फायदेशीर ठरेल WhatsApp चं हे फिचर, काय आहे घ्या जाणून

अनेक लोकं घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

0113

कोरना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबल्यासारखं झालं आहे. अनेक लोकं घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

जाहिरात
0213

WhatsApp ग्रुपवरुन लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. पण अनेकदा ग्रुपवर खूप सारे मेसेज आल्यानं काही महत्त्वाच्या मेसेजकडे दुर्लक्ष होतं.

जाहिरात
0313

पण WhatsApp मध्ये असं काही सेटिंग आहे. ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे मेसेज आल्यावर लगेच तुम्हाला समजेल आणि कोणताही मेसेज दुर्लक्षित होणार नाही.

जाहिरात
0413

तुम्ही WhatsApp वर काही महत्त्वाच्या कॉन्टॅक्टसाठी रिंगटोन सेट करु शकता. जेव्हा त्या नंबरवर एखादा मेसेज येईल त्यावेळी तुम्हाला लगेच समजेल. जाणून घ्या कसं करायचं सेटिंग...

जाहिरात
0513

स्टेप 1- सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणारा नंबर सर्च करा.

जाहिरात
0613

स्टेप 2- तुमच्यासाठी महत्त्वाचा असलेला नंबर सर्च करा. ज्याच्यासाठी तुम्हाला खास रिंगटोन सेट करायची आहे त्या कॉन्टॅक्टच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 डॉटवर क्लिक करा.

जाहिरात
0713

स्टेप 3- जेव्हा 3 डॉटवर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे अनेक पर्याय दिसतील. त्यातील View Contact या पर्यायावर क्लिक करा.

जाहिरात
0813

स्टेप 4 – View Contact वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या नंबरचा डीपी आणि त्या खाली अनेक ऑप्शन दिसतील. त्यातील Custom notifications वर क्लिक करा.

जाहिरात
0913

स्टेप 5 - Custom notifications वर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आणखी काही पर्याय असतील. यातील Use Custom notifications या पर्यायावर टिक मार्क करा.

जाहिरात
1013

स्टेप 6 – या ठिकाणी खाली दिलेल्या नोटिफिकेशन टोनवर क्लिक करुन तुमच्या आवडीची रिंगटोन त्याठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर OK च्या बटणावर क्लिक करा. तुमची सेटिंग पूर्ण झाली. आता जेव्हाही त्या नंबरवरुन मेसेज येईल त्यावेळी तुम्हाला लगेच अलर्ट मिळेल.

जाहिरात
1113

स्टेप 7- अशाचप्रकारे तुम्ही WhatsApp ग्रुपसाठीही नोटिफिकेशन सेट करु शकता. यासाठी पहिल्यांदा WhatsApp ग्रुपवर क्लिक करा. त्यानंतर उजव्या बाजूला देण्यात आलेल्या 3 डॉटवर क्लिक करा.

जाहिरात
1213

स्टेप 8 – या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील त्यातील ग्रुप इन्फो या पर्यायावर क्लिक करा.

जाहिरात
1313

स्टेप 9 – ग्रुप इन्फोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील. यातील Custom notifications वर क्लिक करा त्यानंतर प्रकिया WhatsApp कॉन्टॅक्ट सारखीच आहे. (संकलन : मेघा जेठे.)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या