JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp Forward वर आता येणार आणखी बंधनं! तुमच्या वापरावर असा होणार परिणाम

WhatsApp Forward वर आता येणार आणखी बंधनं! तुमच्या वापरावर असा होणार परिणाम

जगभरातले अब्जावधी नागरिक व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp ) वापर करतात. आतापर्यंत या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या (Social Media Platform) काही चांगल्या आणि वाईट गोष्टी समोर आल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्सचे (WhatsApp Forwards) अनेक वाईट पैलू निदर्शनास आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मार्च : जगभरातले अब्जावधी नागरिक व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp ) वापर करतात. आतापर्यंत या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या (Social Media Platform) काही चांगल्या आणि वाईट गोष्टी समोर आल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्सचे (WhatsApp Forwards) अनेक वाईट पैलू निदर्शनास आले आहेत, त्यामुळे अ‍ॅपद्वारे चुकीची माहिती (Misinformation) आणि खोट्या बातम्यांचा (Fake News) प्रसार मर्यादित करण्यासाठी कंपनीने कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. मेटा म्हणजेच पूर्वाश्रमीच्या फेसबुक कंपनीची मालकी (Meta-owned) असलेल्या या प्लॅटफॉर्मवर तुम्ही चॅट (Chat) किती वेळा फॉरवर्ड (Forward) करू शकता यावर यापूर्वीच मर्यादा घालण्यात आली होती. भविष्यात ही मर्यादा अधिक कठोर होऊ शकते, अशी माहिती एका नवीन रिपोर्टमधून समोर आली आहे. WABetainfoच्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅप हा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आता सर्व मेसेजेसच्या फॉरवर्डिंगवर आणखी मर्यादा घालू इच्छित आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर (Feature) व्हॉट्सअ‍ॅप बीटाच्या (Android Beta) v2.22.7.2 अँड्रॉइड व्हर्जनमध्ये (Android Version) दिलं जाणार आहे. जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना एकापेक्षा जास्त ग्रुपवर व्हायरल फॉरवर्डेड मेसेज पाठवायचा असेल तेव्हा त्यांना स्क्रीनवर ‘फॉरवर्डेड मेसेज कॅन बी सेंट टू ओन्ली वन ग्रुप’ असा मजकूर दिसत असल्याचं संबंधित रिपोर्टमध्ये दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप युझर्स एक व्हायरल फॉरवर्ड मेसेज फक्त एका चॅटवर शेअर करू शकतात. त्यानंतर त्यांना इतरांकडून फॉरवर्ड केलेल्या मेसेजची मर्यादा आणि वारंवारता (Frequency) याबद्दल अलर्ट केलं जाईल. सोशल मीडिया इकोसिस्टीममध्ये (Social Media Ecosystem) व्हायरल होण्यासाठी डिझाइन केलेल्या विशिष्ट मेसेजेसचा रीच मर्यादित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं या बदलातून निदर्शनास येत आहे. मेसेज फॉरवर्डिंगची प्रक्रिया अधिक कंटाळवाणी (Tedious) करण्याच्या प्रयत्नात व्हॉट्सअ‍ॅप असल्याची शक्यता आहे. यामुळे युझर्सना त्यांच्या फॉरवर्डिंगच्या कृतीचा पुनर्विचार करावाच लागेल आणि परिणामी चुकीच्या मेसेजेसच्या प्रसारावर आपोआप मर्यादा येईल. एंड टू एंड एन्क्रिप्शन हे व्हॉट्सअ‍ॅपचं वैशिष्ट्य आहे. त्याला धक्का न लावता अ‍ॅपचा गैरवापर रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप प्रयत्नशील आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवीन रोलआउट बीटा व्हर्जनमध्ये असल्यानं त्याचं अद्याप टेस्टिंग सुरू आहे. युझर्सपर्यंत ते कधी पोहोचेल याचा अंदाज आलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या