नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. कारण चीनमधील स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या vivo कंपनीने त्यांच्या एका स्मार्टफोनवर पाच हजारांची सूट देण्यात आली आहे.
विवो कंपनीने Vivo Nex या स्मार्टफोनवर 5 हजारांची सूट देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची खरी किंमत 44,990 रुपये इतकी आहे. पण कंपनीने सवलत दिल्यामुळे या फोनला तुम्ही 39,990 रुपयात खरेदी करता येणार आहे.
तुम्ही अॅमेझॉनवरून vivo nex हा स्मार्टफोन खरेदी करून फोनचं पेमेंट yes Bankच्या क्रेडिट कार्डनं करणार असाल तर तुम्हाला 10 टक्के डिस्काऊंट मिळू शकतं. आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्के डिस्काऊंट देण्यात येईल.
एवढंच नव्हे तर हा स्मार्टफोन एक्स्चेंज ऑफरमध्येही खरेदी करता येऊ शकतो. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्हाला 21 हजारांचं डिस्काऊंट मिळेल.
Vivo NEX Dual फोनचा डिसप्ले 6.59 इंच असून Full HD+Super AMOLED आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोअरेज आहे.
फोनचा कॅमेरा अगदी उत्तम आहे. कॅमेऱ्याचं पहिलं सेंसर 12 मेगापिक्सल आहे, तर दुसरं सेंसर 5 मेगापिक्सल आहे. आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे.