JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 'Mi 10T Pro स्मार्टफोन येत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही', तरुणाच्या ट्विटनंतर शाओमीचं भन्नाट सरप्राईज

'Mi 10T Pro स्मार्टफोन येत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही', तरुणाच्या ट्विटनंतर शाओमीचं भन्नाट सरप्राईज

माझ्या हातात जोपर्यंत Mi 10T Pro स्मार्टफोन येत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असं भन्नाट उत्तर दिलं. त्याने ही इच्छा केवळ व्यक्त केली नाही, तर कंपनीने ती पूर्णही केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : नातेवाईकांकडून अनेकदा लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जातो. नातेवाईकांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अनेक जण काही ना काही सांगून वेळ मारून नेतात. पण एका MI मोबाईल कंपनीच्या फॅनने लग्न करण्यासाठी वेगळंच कारण दिलं आहे. त्या तरुणाने, माझ्या हातात जोपर्यंत Mi 10T Pro स्मार्टफोन येत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असं भन्नाट उत्तर दिलं. त्याने ही इच्छा केवळ व्यक्त केली नाही, तर कंपनीने ती पूर्णही केली. कमाल अहमद या ट्विटर युजरने, Mi 10T Pro स्मार्टफोन येत नाही, तोपर्यंत लग्न करणार नसल्याचं 11 डिसेंबर रोजी ट्विट केलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच 21 डिसेंबर रोजी त्या मुलाला कंपनीकडून Mi 10T Pro स्मार्टफोन गिफ्ट करण्यात आला. हा फोन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा ट्विट करून कंपनीचे आभार मानले आहेत.

कंपनीने त्याच्या या ट्विट नंतर उत्तर देताना सांगितलं की, तो एमआय फॅन असल्याचं यावरून समजलं. आता त्याचा आवडीचा फोन मिळाल्यानंतर आता तो लग्न करण्यास तयार असेल असं मजेशीरपणे सांगितलं आहे.

शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनीही ट्विटरवर या तरूणाचं अभिनंदन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या