JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Twitter ला टक्कर देण्यासाठी भारताने बनवला नवा अॅप, ही आहेत वैशिष्ट्ये

Twitter ला टक्कर देण्यासाठी भारताने बनवला नवा अॅप, ही आहेत वैशिष्ट्ये

जाहिरातीपासून ते व्यवयासापर्यंत सगळी कामं हल्ली या सोशल मीडियाच्या माध्यमातून होतात. बाजारात वारंवार नेटकऱ्यांसाठी नवे अॅप्स उपलब्ध होत असतात. आताही ट्विटरला टक्कर देण्यासाठी भारताने एक जबरदस्त अॅप तयार केला आहे.

0106

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचं मोठं माध्यम आहे. जाहिरातीपासून ते व्यवयासापर्यंत सगळी कामं हल्ली या सोशल मीडियाच्या माध्यमातून होतात. बाजारात वारंवार नेटकऱ्यांसाठी नवे अॅप्स उपलब्ध होत असतात. आताही ट्विटरला टक्कर देण्यासाठी भारताने एक जबरदस्त अॅप तयार केला आहे.

जाहिरात
0206

ट्विटरला टक्कर देण्यासाठी भारताने स्वतःचं अ‍ॅप तयार केलं आहे. भाषेनुसार भारतात मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा कल हळूहळू वाढत आहे. त्यामळे भारतीय लोकांना त्यांच्या भाषेत माहिती देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

जाहिरात
0306

एका अहवालानुसार, भारतातील अजूनही बहुतेक लोक इंग्रजीऐवजी मातृभाषेत बोलणं पसंत करतात. त्यामुळे Koo App सारखं माध्यम तयार करण्यात आलं आहे. जिथे लोक त्यांना हव्या त्या भाषेमध्ये बोलू शकतात आणि वाचू शकतात.

जाहिरात
0406

हे अ‍ॅप अगदी ट्विटरसारखेच आहे. यामध्ये गोष्टी पोस्ट केल्या जाऊ शकतात, तसंच फोटो आणि व्हिडिओही जोडता येतात. इतर पोस्टवर कमेंट्स सोबत तुम्ही त्यांना फॉलोही करू शकता. यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि मजकूर असे तिन्ही पर्याय उपलब्ध आहे.

जाहिरात
0506

कंपनीने या अॅपला हिंदी भाषेव्यतिरिक्त तमिळ, कन्नड आणि तेलगू भाषेत बाजारात आणलं आहे. त्याचबरोबर कंपनी मराठी, गुजराती, पंजाबी, आसामी, बांगला, मल्याळम, उडिया या भाषांमध्येदेखील हा अॅप आणणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा अॅप कंपनीने अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी उपलब्ध केला आहे.

जाहिरात
0606

अनेक चायनीज अॅप बंद झाल्याने अ‍ॅप्सच्या जगात भारतात अनेक संधी खुल्या झाल्या आहेत. युवा पिढीला मोदींनी स्वावलंबी असल्याचा नारा देऊन मेड इन इंडिया अ‍ॅप्स बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या