Solar AC: एसी कितीही वापरला तरी वीज बिल येईल शून्य; वाचा सविस्तर
मुंबई, 21 जुलै: अलीकडच्या काळात उष्णतेचं प्रमाण खूप वाढलंय. उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णतेमुळं लोक हैराण होतातच, परंतु इतरवेळीही गरमीचं प्रमाण जास्त असल्यामुळं लोक अस्वस्थ असतात. कडक उन्हामुळे अनेकांना त्यांची कामं करता येत नाहीत आणि घराबाहेर पडतानाही अनेक वेळा विचार करावा लागतो. अशा स्थितीत पंखे आणि कुलर उन्हाच्या तडाख्यासमोर फिके पडतात. म्हणूनच लोक एसीकडे वळतात. म्हणजेच एसी चालवतात. मात्र यात एक अडचण अशी आहे की, एसी चालवताना जास्त बिल येण्याची लोकांना चिंता असते. एसी चालू असताना, कंप्रेसर थंड हवा सोडण्याचं काम करतो. त्यासाठी भरपूर वीज लागते. त्यामुळे वीज बिल (Electricity Bill due to AC) जास्त येतं. पण जर तुम्हीही या वीज बिलाने हैराण असाल तर आम्ही तुम्हाला एसी चालवूनही तुमचं वीज बिल शून्यावर कसं येऊ शकतं, याबद्दल सांगणार आहोत. एसी वापरूनही वीज बील शून्य कसं येऊ शकतं?- आता तुम्हाला प्रश्न पडला असले की, एसी वापरूनही बील शुन्य कसं येऊ शकतं? वास्तविक, ज्या एसीबद्दल आपण बोलत आहोत, तो चालवण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे, कारण तो सोलर एसी (Solar AC) आहे. हेही वाचा: Disability Pension: रजेदरम्यान अपघात झाल्यास लष्करी जवानांना मिळणार नाही अपंगत्व निवृत्ती वेतन, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय वीज बिल शून्य कसे होणार? तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की तुम्हाला तुमच्या घरात सामान्य एसी ऐवजी सोलर एसी बसवावा लागेल. तो सूर्यप्रकाशाने चार्ज होतो आणि वीजेचा वापर होत नाही. त्यामुळे वीज बिल शून्यावर येतं. यासाठी तुम्हाला सोलर पॅनल बसवावा लागेल. सोलर पॅनल दीर्घकाळ उपयोगी पडतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोलर एसी वापरत असाल तर तो चालवायला विजेची गरज नसते, तर सूर्यप्रकाशाची गरज असते, जेणेकरून तो चार्ज करता येईल. इतका होऊ शकतो खर्च - एसी चालवण्यासाठी तुम्हाला वीज बिल भरावं लागू नये, असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील कारण त्याची किंमत सामान्य एसीच्या तुलनेत थोडी जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरासरी क्षमतेच्या सोलर एसीची बाजारातील किंमत सुमारे 99 हजार रुपये आहे.