मुंबई, 10 मार्च : हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागत आहे. दिवसा तीव्र उष्मा जाणवू लागला आहे. उन्हाळा जवळ येताच एअर कूलर, एसी (AC), पंखे (Fan) खरेदीसाठी सर्वांची लगबग सुरू झाली आहे. उन्हाळ्यात एकीकडे विजेला मागणी वाढलेली असताना दुसरीकडे मात्र उष्म्यासोबत भारनियमनाच्या (Load Shedding) झळा सहन कराव्या लागतात. यावर पर्याय म्हणून काही जण जनरेटर (Generator) , इन्व्हर्टर (Inverter) खरेदी करतात; पण या गोष्टीही फारशा उपयुक्त ठरताना दिसत नाहीत. कारण भारनियमनामुळे इन्व्हर्टर चार्जिंग होण्यात अडचणी निर्माण होतात, तर जनरेटला जास्त इंधन लागतं. सध्याचे इंधनाचे वाढते दर बघता जनरेटरचा वापर खर्चिक ठरतो; मात्र या समस्येवर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता बाजारात असा एक जनरेटर आला आहे, की जो तुम्ही घरात कुठेही ठेवू शकता. तसंच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता. या जनरेटरवर तुम्ही पंखे, टीव्ही, लॅपटॉपसारखी मोठी उपकरणंही अगदी सहज वापरू शकता. वाढत्या उकाड्यापासून दिलासा कसा मिळवता येईल, हा प्रश्न उन्हाळ्यात अनेकांना भेडसावतो. त्यासाठी पंखे, कूलर आणि एसीही खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. उन्हाळ्यात भारनियमनामुळे या वस्तू वापरण्यावर मर्यादा येतात. मग त्यावर पर्याय म्हणून जनरेटर किंवा इन्व्हर्टर खरेदी केला जातो; पण त्यातही वीज उपलब्धता आणि इंधन दराचा अडसर असतो. ग्राहकांची ही अडचण दूर करण्यासाठी आता बाजारात सौर ऊर्जेवर चालणारा एक अनोखा जनरेटर दाखल झाला आहे. SARRVAD कॅम्पिंग सोलर पॉवर जनरेटर S-150 (Sarrvad Camping Solar Powered Generator S-150) असं या अनोख्या जनरेटरचं नाव आहे. हा एक सोलर पॉवर जनरेटर आहे. हा जनरेटर सूर्यप्रकाशाने चार्ज होतो. या जनरेटरमध्ये 2 वॅटचा एक अल्ट्रा ब्राइट एलडीई (LED) देण्यात आला आहे. त्याचा वापर तुम्ही अंधार असताना करू शकता. SARRVAD कॅम्पिंग सोलर पॉवर जनरेटर S-150 मध्ये हाय स्पीड क्षमतेची बॅटरी पॉवर (Battery Power) मिळेल. यात 42000mAhची बॅटरी असून, यावर तुम्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणंही चालवू शकता. हा जनरेटर किती तास चालेल या प्रश्नाचं सोप्या शब्दात उत्तर द्यायचं झालं, तर जनरेटर एकदा चार्ज केल्यावर त्याद्वारे तुम्ही अॅपलचं (Apple) आयफोन 8 (iphone 8) मॉडेल 20 वेळा चार्ज करू शकता. तसंच तुम्ही यावर स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप चार्जिंगसह रेडिओ, पंखे, टीव्ही आदी अनेक मोठी उपकरणं चालवू शकता. हा जनरेटर तुम्ही अॅमेझॉनवरून (Amazon) खरेदी करू शकता. या जनरेटरची किंमत तुलनेनं खूपच कमी आहे. हा सोलर पॉवर्ड जनरेटर 16 हजार रुपयांत खरेदी करता येईल. तुमचं बजेट कमी असेल, तर तुम्ही तो `ईएमआय`वरही खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला महिन्याला केवळ 1000 रुपये द्यावे लागतील; पण या जनरेटरमुळे तुमचा उन्हाळा काहीसा सुसह्य होईल हे नक्की.