JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 7000 mAh दमदार बॅटरी! Oppo आणि realme ला टक्कर देणार Samsung M51

7000 mAh दमदार बॅटरी! Oppo आणि realme ला टक्कर देणार Samsung M51

HD सुपर अॅम्युलेटेड डिस्प्ले, 6+128 GB इंटरनल मेमरी, 512 जीबीपर्यंत ही मेमरी वाढवता येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 सप्टेंबर : OPP आणि realme ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग कंपनीनं दमदार सिरिज लाँच केली आहे. A आणि M सिरीजचे नवीन फोन अगदी कमी बजेटपासून अत्याधुनिक सुविधांपर्यंत कमी किंमतीत जास्त चांगले फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. M30 आणि M31, M31s ला मिळालेल्या ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादानंतर पुन्हा एकदा जास्त बॅटरी असलेल्या दमदार फोन सॅमसंग बाजारात आणणार आहे. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता हा फोन ऑनलाइन लाँच होणार आहे. या फोनची किंमत साधारण 31, 400 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. अॅमेझॉनवर देखील या फोनचा सेल असणार आहे. 6.7 इंचाच या फोनला पंच होल डिस्प्ले मिळणार आहे. याशिवाय 7000 mAhची दमदार बॅटरी पहिल्यांदाच सॅमसंग मोबाईलमध्ये कंपनी लाँच करत आहे.

HD सुपर अॅम्युलेटेड डिस्प्ले, 6+128 GB इंटरनल मेमरी, 512 जीबीपर्यंत ही मेमरी वाढवता येणार आहे. 64 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासोबत 12+5+5 मेगापिक्सेल कॅमेऱ्या मिळणार आहे. याशिवाय 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा ग्राहकांना या फोनमध्ये मिळणार आहे. याशिवाय रेडिओ, 4G, LTE सपोर्ट, USB सी टाइप पोर्ट आणि फिंगरप्रिंग सेंसर अशा अनेक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. 25 वॅटचा फास्ट चार्जर ग्राहकांना मिळणार आहे. साधारण 30 ते 40 टक्के फोन चार्ज होण्यासाठी वेळ लागू शकतो त्यानंतर मात्र पटकन चार्जिंग पुढचं होईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या