Renault Duster discounts
नवी दिल्ली, 13 डिसेंबर: कार घेणं (Car) ही काही आता चैनीची गोष्ट राहिलेली नाही. शहरातल्या रहिवाशांसाठी तर ती अत्यावश्यक बाब बनली आहे. पण लॉकडाउन, आर्थिक चणचण यामुळे गरज असूनही अनेकजणांनी कार घेणं लांबणीवर टाकलं होतं. आता ज्यांना कार घ्यायची आहे त्या सगळ्यांसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे. रेनॉ इंडिया (Renault India) या कंपनीनं कारवर भरघोस ऑफर्स जाहीर केल्या आहेत. याबद्दलचं वृत्त ‘झी न्यूज’नं दिलं आहे. रेनॉ इंडियानं (Renault India) या वर्षीचा उरलेला स्टॉक संपवण्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये त्यांच्या कारवर बंपर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ही कंपनी मूळची फ्रान्सची आहे. काही निवडक वाहनांवर जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे अशी माहिती या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून कळली आहे. या सर्व ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट (Cash Discount),एक्स्चेंज बेनिफिट, (Exchange Benifit) लॉयल्टी बेनिफिट (Loyality Benefit) आणि कॉर्पोरेट डिस्काउंट (Corporate Discount) असे विविध प्रकारचे डिस्काउंट असतील. अर्थात शहर, मॉडेल आणि डिलरशीपनुसार यामध्ये बदल होऊ शकतात. रेनॉतर्फे या सगळ्या ऑफर्स 31 डिसेंबर 2021 पर्यंतच उपलब्ध असतील. कायगर वगळता अन्य सर्व वाहनांवर 10 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनसही मिळणार आहे. हा बोनस कंपनीच्या r.e.li.v.e या स्क्रॅपेज प्रोगामचा भाग आहे. रेनॉ डस्टरवर कंपनीनं एकूण दीड लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनस, आरएक्सझेड-1.5 लिटर वगळता अन्य सर्व व्हेरियंट्स 50 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट आणि 30 हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. रेनॉ डस्टरच्या ग्राहकांसाठी खास लॉयल्टी बेनिफिट दिला जाणार आहे. तर रेनॉ कायगरवर 10 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस आणि 10 हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. रेनॉ क्विड ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर या गाडीवर एकूण 35 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकणार आहे. यातील काही निवडक व्हेरियंट्सवर 10 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. त्याशिवाय रेनॉ कंपनीकडून 10 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनसही दिला जात आहे. स्टॉकमध्ये उपलब्ध असलेल्या vin20 कारवर 10 हजार रुपयांपर्यंतचे अन्य डिस्काउंटही कंपनीकडून दिले जात आहेत. ट्रायबरवर विविध डिस्काउंट ट्रायबर एमपीव्हीच्या (Triber MPV) 2020 आणि 2021 या मॉडेल्सवर विविध डिस्काउंट उपलब्ध आहेत. 2020 चं मॉडेल खरेदी करायचं असेल तर त्यांना एकूण 60 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. या सर्व ऑफरमध्ये 25 हजार रुपयांपर्यंतची रोख सूट, 25 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि काही निवडक व्हेरियंट्सवर 10 हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बोनस हे देखील आहे. तर 2021 चं मॉडेल घेणाऱ्यांसाठीही धमाकेदार ऑफर आहेत. एकूण 40 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. यामध्ये 10 हजार रुपयांपर्यंतची रोख सूट, 20 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेर्ट बोनस अशा ऑफर्स आहेत. कंपनीतर्फे एमपीव्हीवर 10 हजार रुपयांपर्यंतचा खास लॉयल्टी बोनसही देण्यात येणार आहे. एकूणच, जर तुम्ही कार घेण्यासाठी थांबला असाल किंवा तुमची जुनी कार तुम्हाला बदलायची असेल तर ही संधी सोडू नका. या धमाकेदार ऑफर्स मिळाल्या तर तुमचा आर्थिक फायदाही होऊ शकतो आणि कार घेण्याचं स्वप्नंही पूर्ण होऊ शकतं.