नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढताना दिसत आहे. आज अनेक देश या साथीच्या आजाराचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. कोरोना काळात एकूणच आरोग्य व्यवस्थेवर आणि त्यातही पॅथॉलॉजी लॅब्जवर (Pathology Labs) कमालीचा ताण आल्याचं दिसून येत आहे. कोरोनाची तपासणी करण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक या लॅब्जमध्ये जात असल्याने या यंत्रणेवर परिणाम झाल्याचं दिसून येतं. कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी प्रामुख्याने रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid Antigen Test) आणि आरटी-पीसीआर (RT-PCR) या चाचण्या केल्या जातात. यातून रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह स्पष्ट होतं. मात्र या दोन्ही तपासण्या काहीशा महाग असल्याने सर्वच नागरिकांना त्या परवडतात असं नाही. यासाठी काही महिन्यांपूर्वी नागरिकांना घरच्या घरी कोरोना टेस्ट करता यावी यासाठी खास किट तयार केलं गेलं. याचाही काही प्रमाणात फायदा नागरिकांना होत आहे. आता संशोधकांनी यापुढे एक पाऊल टाकत एक नवं प्रगत तंत्रज्ञान कोरोना टेस्टसाठी (Corona Test) विकसित केलं आहे. यानुसार नागरिक आता स्मार्टफोनच्या (Smartphone) मदतीनं घरीच कोरोना टेस्ट करू शकणार आहेत. विशेष म्हणजे ही टेस्ट अत्यंत कमी दरांत उपलब्ध असेल आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही अधिक उपयुक्त ठरेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. याबाबतचं वृत्त `टीव्ही 9 हिंदी`ने दिलं आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणात अफवांचं पीक; तिघांवर गुन्हे स्मार्टफोनच्या सहाय्यानं कोरोना टेस्ट करण्याचं तंत्रज्ञान कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या (California University) संशोधकांनी विकसित केलं आहे. मात्र ही टेस्ट अद्याप मोठ्या प्रमाणावर वापरासाठी उपलब्ध नसेल. कारण या टेस्टची चाचणी संशोधकांनी केवळ 50 रुग्णांवर केली आहे. यात 20 सिम्प्टोमॅटिक आणि 30 असिम्प्टोमॅटिक रुग्णांचा समावेश आहे. या चाचणीसाठी सॅमसंग गॅलक्सी एस 9 या स्मार्टफोनचा वापर केला गेला आहे. `सीएनईटी`ने दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या या नव्या टेस्टिंग तंत्रज्ञानासाठी सुरुवातीला 100 डॉलरपेक्षा कमी किमतीच्या डिव्हाइसची गरज आहे. हे डिव्हाइस लावल्यानंतर एका टेस्ट केवळ 7 डॉलर म्हणजेच 525 रुपये खर्च होणार आहे. स्मार्ट लॅंप (लूप-मेडियेटेड इजोटेर्मल एम्प्लिफिकेशन) असं या टेस्टींग तंत्रज्ञानाचं नाव आहे. हे टेस्ट किट इन्स्टॉल करण्यासाठी युजर्सकडे हॉट प्लेट, रिअॅक्टिव्ह सोल्युशन (Reactive Solution) आणि स्मार्टफोन असणं गरजेचं आहे. त्यानंतर युजर्सला त्यांच्या स्मार्टफोनवर बॅक्टिकाउंट नावाचं संशोधकांचं विनामूल्य अॅप डाउनलोड करणं आवश्यक आहे. हे अॅप फोनच्या कॅमेराने कॅप्चर केलेल्या डाटाचे विश्लेषण करेल आणि कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याविषयी युजर्सला सूचित करेल. सरकारी भरतीमध्ये OBC ला 27% आणि ST 20% आरक्षण; Open कॅटेगरीवर काय होणार परिणाम? जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या पेपरनुसार, युजरला त्यांची लाळ (Saliva) हॉट प्लेटवरील चाचणी किटवर टाकावी लागेल. त्यानंतर युजरला त्यावर रिअॅक्टिव्ह सोल्यूशन टाकावं लागेल. सोल्यूशन टाकल्यावर लिक्विडचा रंग बदलेल. या लिक्विडचा रंग किती लवकर बदलतो, यावरून लाळेतील व्हायरल लोडच्या प्रमाणाचा अंदाज हे अॅप लावेल. या तंत्रज्ञानाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे याद्वारे कोरोनाच्या सर्व प्रकारांविषयी माहिती मिळू शकेल. यात अल्फा, बी.1.1.7 (यूके व्हेरियंट), गॅमा , पी 1 ( ब्राझील व्हेरियंट), डेल्टा, बी 1.617.2 (भारत व्हेरियंट), एप्सिलॉन , बी 1.429 (CAL20C) आणि Iota, B.1.562 (न्यूयॉर्क व्हेरियंट) यांचा समावेश आहे. हे टेस्टिंग तंत्रज्ञान अद्याप मोठ्या प्रमाणावर वापरासाठी तयार नाही. मात्र, लवकरच हे टेस्टिंग तंत्र बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केली आहे.