नवी दिल्ली, 15 डिसेंबर : कोरोना व्हायरस, लॉकडाउनमुळे ऑटो सेक्टरवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहन निर्माता कंपन्या आपला व्यवसाय पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी आपल्या वाहनांवर अनेक स्किम आणि ऑफर्स देत आहेत. त्यानंतर आता अनेक विमा कंपन्यांनीही नवीन इंश्योरन्स पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीअंतर्गत वापरकर्ता ज्यादिवशी गाडीचा वापर करेल, त्यादिवशीचाच प्रीमियम त्याला भरावा लागेल. ही विमा पॉलिसी कधीही चालू किंवा बंद करता येऊ शकते. Pay as you drive पॉलिसी - जितकी गाडी चालवली जाईल, तितकाच प्रीमियम भरावा लागेल, अशी पॉलिसी घ्यायची असल्यास एडलवाइस स्विच (Edelweiss SWITCH) आणि टाटा एआयजीची (Tata AIG) ऑटो सेफ ( Auto Safe) पॉलिसी घेता येऊ शकते. रेग्युलर मोटर इंश्योरन्स पॉलिसीमध्ये ग्राहकांना कार मॉडेलच्या आधारे प्रीमियमचं पेमेंट करावं लागतं. परंतु आता पॉलिसी होल्डर्स आपला प्रीमियम कस्टमाईज करू शकतात. Edelweiss SWITCH - एडलवाइस जनरल इंश्योरन्सने एका अॅपद्वारे ऑटो विमा पॉलिसीची घोषणा केली आहे. या अॅपचं नाव Edelweiss SWITCH असं आहे. ही अनोखी विमा योजना वापरकर्त्यांना केवळ वाहनाच्या उपयोगाच्या दिवसाचा प्रीमियम भरण्यासाठी आहे. ही विमा योजना वाहन मालकांना जेव्हा हवं तेव्हा पॉलिसी चालू आणि बंद करण्याची परवानगी देते.
इंश्योरन्स ऑन-ऑफवर आधारित असेल कव्हर - या इंश्योरन्सची गणना चालकाचं वय आणि अनुभवाच्या आधारे केली जाते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक या मोबाईल अॅप्लिकेशनचा उपयोग आपल्या पॉलिसी कव्हरला ऑन आणि ऑफ करण्यासाठी करू शकतात. म्हणजेच, ज्यादिवशी गाडी चालवणार त्यादिवशी ऑन आणि न चालवल्यास पॉलिसी ऑफ करता येणार आहे.
ज्यावेळी पॉलिसी बंद असेल आणि अचानक आग किंवा चोरीसारख्या घटना घडल्यास, संपूर्ण वर्षात वाहनाला पॉलिसी कव्हर मिळेल. परंतु अपघाती नुकसानात, ज्यावेळी विमा ऑन असेल, तेव्हाच पॉलिसी कव्हर मिळेल. Tata AIG ची Auto Safe - AIG जनरल इंश्योरन्सने नवे टेलिमेटिक्स बेस्ड अॅप्लिकेशन आणि डिवाईस ‘AutoSafe’ लाँच केलं आहे. हे पॉलिसी होल्डर्सद्वारे पार केलेलं अंतर सिलेक्ट करून मोटर इंश्योरन्स प्रीमियममध्ये बचतीची सुविधा देतं. ‘AutoSafe’ डिवाईस जीपीएस तसंच टेलिमेटिक्स टेक्नोलॉजीचा वापर करून कार चालवण्यावर नजर ठेवते आणि अॅपशी कनेक्ट होते. त्यानंतर अॅपद्वारे कारच्या अंतराचं आकलन करून विमा प्रीमियम ठरवला जातो. ‘AutoSafe’ अँटी थेफ्ट डिवाईस म्हणूनही काम करतं.