JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वरच्या या धोकादायक मेसेजपासून सावधान! बँक अकाऊंट होऊ शकतं हॅक

WhatsApp वरच्या या धोकादायक मेसेजपासून सावधान! बँक अकाऊंट होऊ शकतं हॅक

आजकाल ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना वाढल्या आहेत. गेल्या काही काळात मोबाइलवरून (Mobile) आर्थिक व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यासाठी बँक खातं मोबाइल नंबरशी जोडलेलं असतं, त्यामुळे सायबर गुन्हेगार मोबाइल हॅक करून फसवणूक करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑगस्ट : आजकाल ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना वाढल्या आहेत. गेल्या काही काळात मोबाइलवरून (Mobile) आर्थिक व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यासाठी बँक खातं मोबाइल नंबरशी जोडलेलं असतं, त्यामुळे सायबर गुन्हेगार मोबाइल हॅक करून फसवणूक करत आहेत. कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे डिजिटल व्यवहार वाढल्यानं ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा संशोधकांनी एका नवीन धोक्याचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअॅपच्या(Whats App) माध्यमातून ही आर्थिक फसवणूक केली जात असून सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवत आहेत आणि त्यावर ऑनलाइन ऑर्डर देण्याची सूचना युझर्सना करत आहेत. जे युझर्स या अमिषाला बळी पडून या लिंकवर क्लिक करून ऑर्डर पाठवतात त्याचं बँक खातं रिकामं होतं आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अज्ञात ठिकाणाहून किंवा व्यक्तीकडून आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, असा इशारा कॅस्परस्की लॅबने (Kaspersky Lab) दिला आहे. कॅस्परस्की लॅबमधील रशियन संशोधकांनी वेगाने वाढत असलेल्या या पॅकेज डिलिव्हरी घोटाळ्याबद्दल (Package Delivery Scam) सावधगिरीचा इशारा दिला आहे. यासाठी सायबर गुन्हेगार ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांचे अधिकारी म्हणून आपली ओळख सांगतात आणि समोरच्या व्यक्तीला त्यांच्या घरी एखादं पॅकेज पोहोचवायचे आहे अशी थाप मारतात. त्यानंतर सायबर गुन्हेगार ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगतात. तसंच त्यांचे पार्सल त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचले आहे याची खात्री करण्यासाठी किंवा कस्टम ड्यूटी ते शिपमेंट पेमेंटपर्यंत काहीही कारण सांगून त्यांना थोडे पैसे पाठवण्यासही सांगितले जाते. त्यानंतर युझर्सना एका बनावट वेबसाइटवर नेले जाते तिथं ते पैसे देतातच पण त्याबरोबर बँक कार्ड आणि खात्याची माहितीदेखील देतात. मग काही क्षणातच त्यांचे बँक खाते रिकामे होते. गेल्या तीन महिन्यांत अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे, असं कॅस्परस्की लॅबनं म्हटलं आहे. अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून काही खरेदी करतो तेव्हा आपण काय ऑर्डर केली आणि ते पार्सल कधी येणार आहे, हे तुम्हाला माहिती असते कारण तुमच्या अॅपवर ट्रॅकर आहे ज्याद्वारे तुम्हाला ही माहिती मिळते. कोणतीही कंपनी तुम्हाला पार्सल पोहोचले आहे का, याची खात्री करण्यासाठी पैसे देण्यास सांगणार नाही, अगदी तुम्ही कॅश ऑन डिलीव्हरी पर्याय निवडला असेल तरीही. मात्र तरीदेखील लोक अशा मेसेजना फसत आहेत. त्यामुळे युझर्सनी नेहमी विश्वासार्ह वाटत नसलेल्या मेसेजेसचा सोर्स तपासावा असा सल्ला सायबर संशोधकांनी दिला आहे. योग्य वेबसाइट नसलेल्या किंवा संशयास्पद दिसणाऱ्या मेसेजेसवर तसंच लिंकवर क्लिक करू नये. अशा घटनांपासून वाचण्यासाठी सुरक्षा उपाय अवलंबण्याचीही सूचना केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या