लोकांना व्हॉट्सअॅपचा वापर करणं सोपं व्हावं,कमी वेळात अनेक गोष्टी यात साध्य व्हाव्या, या हेतूनं व्हॉट्सअॅप सतत काही नवे बदल करत असतं.
मुंबई, 07 जून : मेटा कंपनीचं व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे सर्वांत जास्त वापरलं जाणारं अॅप आहे. वापरण्यासाठी अतिशय सोपं आणि झटपट चॅटिंगमुळे व्हॉट्सअॅप लोकप्रिय आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यात वेळोवेळी बदल केले जातात. याआधी व्हॉट्सअॅपनं डिसअपिअरिंग मेसेज, व्हॉट्सअॅप वेब अशी काही फीचर आणली होती व ती लोकांना आवडली होती. सध्याही व्हॉट्सअॅपमध्ये काही बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी या नवीन फीचर्सचं (New Features) टेस्टिंगही केलं जात आहे. लवकरच व्हॉट्सअॅपच्या पुढच्या व्हर्जनमध्ये काही नवी फीचर्स दिसू शकतील. मेसेज एडिटचा पर्याय इंडियन एक्स्प्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या व्हॉट्सअॅपमध्ये एकदा मेसेज पाठवल्यानंतर तो पुन्हा सुधारता येत नाही. एखादा शब्द लिहायला चुकला किंवा राहिला, तसंच चुकीचा मेसेज लिहिला गेला, तर तो एडिट (Edit Option) करणं आता शक्य होईल. WABetaInfoच्या रिपोर्टनुसार हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये येणार आहे. यामुळे फेसबुकच्या व्हॉट्सअॅपला टेलिग्रामशी बरोबरी करता येणार आहे, कारण टेलिग्राममध्ये सध्या लोकांना मेसेज पाठवल्यानंतर एडिट करण्याचं फीचर उपलब्ध आहे. डिलिट मेसेजसाठी ‘अनडू’ हे फीचर एखादा मेसेज डिलिट करताना तो चुकून ‘डिलिट फॉर मी’ असा केला, तर इतरांना तो मेसेज इतरांना दिसतच राहतो. आपल्याला पुन्हा तो मेसेज इतरांसाठी डिलिट करता येत नाही कारण तो आपण डिलिट केलेला असतो. याला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी व्हॉट्सअॅपचं नवीन फीचरवर काम सुरू आहे. यामुळे चुकून मेसेज ‘डिलिट फॉर मी’ केला गेला. तर स्क्रीनच्या खालच्या बाजूला एक ‘अनडू’ (Undo Button) चे बटण मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध होईल. ते दाबल्यावर डिलिट केलेला मेसेज तुम्हाला दिसेल व पुन्हा तुम्ही ‘डिलिट फॉर एव्हरीवन’ करू शकाल. मीडिया व्हिजिबिलिटी ज्या व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये डिसअपिअरिंग चॅट्स हे फीचर सुरू आहे, तिथे पाठवलेला फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट किंवा व्हॉइस नोट आपोआप मोबाईलवर सेव्ह होऊ नये, यासाठी एका नवीन फीचरची पडताळणी सुरू आहे. हा पर्याय उपलब्ध करून दिल्यावर अँड्रॉइड फोनमध्ये ‘मीडिया व्हिजिबिलिटी’ (Media Visibility Option Turn Off) हा पर्याय आधीच व्हॉट्सअॅपकडून बंद करण्यात येईल. सध्याच्या फीचरमुळे फोनच्या गॅलरीमध्ये हे फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह होतात. नव्या फीचरमुळे ते बंद होईल. अँड्रॉइडनंतर आयफोनसाठीही नवीन फीचर उपलब्ध होईल. तिथेच ‘सेव्ह टू कॅमेरा रोल’ हा पर्याय आधीच टर्न ऑफ केलेला असेल. डिसअपिअरिंग मेसेज सेव्ह करणं व्हॉट्सअॅपवरील चॅट अधिक खासगी करण्याच्या उद्देशानं डिसअपिअरिंग मेसेज (Disappearing Message) हे फीचर सुरू झालं. पण काही वेळा हे फीचर सुरु केलेल्या ग्रुप्समधी एखादा मेसेज महत्त्वाचा असतो. तो मेसेज लोकांना सेव्ह करता यावा, यासाठी व्हॉट्सअॅप प्रयत्न करत आहे. एखादा पत्ता किंवा काही महत्त्वाची सूचना जर डिसअपिअरिंग चॅटमध्ये असेल, तरी ती सेव्ह करणं या नव्या फीचरमुळे शक्य होणार आहे. ग्रुप सोडताना इतरांना जाणार नाही अलर्ट एखाद्यानं ग्रुप सोडला, तर ते ग्रुपमधील इतर सदस्यांना लक्षात येतं. मात्र एखाद्याला गाजावाजा न करता व्हॉट्सअॅप ग्रुप सोडायचा असेल, तर ते सध्या शक्य नाही. त्या दृष्टीनं नव्या फीचरसाठी व्हॉट्सअॅप प्रयत्न करत आहे. नव्या फीचरमुळे एखाद्या व्यक्तीनं ग्रुप सोडला, तर केवळ ग्रुप अॅडमिनलाच (Alert to Admin) ते समजू शकेल, इतरांना समजणार नाही. आणखी सुरक्षा या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप सुरक्षेसाठी डबल व्हेरिफिकेशन (Double Verification) सुरु करण्याच्या विचारात आहे. या फीचरमुळे व्हॉट्सअॅपला लॉग इन करण्यापूर्वी ग्राहकांना आणखी एखादा सुरक्षेचा टप्पा पार करावा लागेल. नवीन फोनवर लॉग इन करताना अतिरिक्त व्हेरिफिकेशन कोड ग्राहकांना द्यावा लागेल. एसएमएसवर आलेला हा कोड पहिल्यांदा लॉगइन करताना आलेल्या कोडपेक्षा वेगळा असेल. स्टेटस रिच लिंक प्रीव्ह्यू नव्या फीचरमुळे स्टेटस अपडेटमध्ये रिच लिंक प्रीव्ह्यू ठेवणं (Status Rich Link Preview) या शक्य होणार आहे. इन्स्टाग्राममध्ये जसं स्टोरीमध्ये रिच लिंक तसंच (WhatsApp’s versions of the ‘Stories’ feature) फीचर व्हॉट्सअॅप उपलब्ध होईल. व्हॉट्सअॅपच्या नव्या बीटा व्हर्जनमध्ये जेव्हा स्टेटस अपडेट म्हणून लिंक शेअर केली जाते तेव्हा तिचा रिच प्रीव्ह्यूही उपलब्ध होत असल्याचं WABetaInfoच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. लोकांना व्हॉट्सअॅपचा वापर करणं सोपं व्हावं,कमी वेळात अनेक गोष्टी यात साध्य व्हाव्या, या हेतूनं व्हॉट्सअॅप सतत काही नवे बदल करत असतं. आता व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये असेच काही बदल पाहायला मिळू शकतील.