JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सावधान! पॉर्न साइट पाहणाऱ्यांनो तुमचा खासगी डेटा झाला लीक

सावधान! पॉर्न साइट पाहणाऱ्यांनो तुमचा खासगी डेटा झाला लीक

पॉर्न पाहणाऱ्यांची माहिती फेसबुक आणि गुगलसारख्या साइटकडे जात असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : पॉर्न पाहणाऱ्यांची माहिती फेसबुक आणि गुगलसारख्या साइटकडे जात असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. याबाबत मायक्रोसॉफ्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसेल्वानिया आणि कार्नेगी मेलॉननं संशोधन केलं होतं. आता पॉर्न साइट पाहणाऱ्यांच्या खासगी माहितीची चोरी होत असल्याचं समोर आलं आहे. एका पॉप्युलर पॉर्न साइटच्या युजर्सची खासगी माहिती शेअर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. द नेक्स्ट वेबनं याच वृत्त दिलं आहे. ल्यूसियस या पॉर्न साइटवरील युजर्सची माहिती लीक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या साइटवर युजर्स त्यांची ओळख लपवून पॉर्न फोटो आणि अॅनिमेशन अपलोड करण्याचा पर्याय आहे. मात्र, यावर फोटो अपलोड करणाऱ्या आणि ते पाहणाऱ्या युजर्सची माहिती vpnMentor ने मिळवली आहे. याबद्दल त्यांनी सांगितलं की, लीक झालेल्या डेटामध्ये युजर्सचे ईमेल्स, स्त्री की पुरुष, कोणत्या देशात राहतात ही माहिती मिळाली आहे. पॉर्न साइटवर युजर्सची अॅक्टिव्हिटीसुद्धा समजली असल्याचं vpnMentor ने सांगितलं आहे. यामध्ये कमेंट, लाइक, अपलोड आणि ब्लॉग पोस्टसुद्धा सहज पाहता येतात. हा सर्व डेटा असुरक्षित आणि अनएनक्रिप्टेड होता. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. ज्या युजर्सनी पॉर्न साइट पाहिली आहे त्यांचे मेल आणि देश यांची माहिती मिळताच फिशिंगच्या जाळ्यात ते अडकू शकतात. तसेच त्यांच्या पॉर्न साइटवरील अॅक्टिव्हिटीचा वापर करून ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. डेटा लीकमध्ये अनेक युजर्सची नावंही समोर आली आहेत. पॉर्न साइटवरील युजर्सची माहिती लीक होत असल्याचं समोर येताच साइटने ही त्रुटी दूर केली आहे. त्यांनी बग शोधून तो काढून टाकला आहे. ल्यूसियसने याची माहिती दिली नसली तरी त्यांची टीमला याबद्दल कळवण्यात आलं होतं. त्यांनी डेटाचा अॅक्सेस कोणाला मिळाला होता कि नाही हे सांगितलेलं नाही. मात्र, डेटा लीकच्या वाढत्या प्रकरणांमुळे आता युजर्सनी सावधानता बाळगावी अशी अपेक्षा केली जात आहे. राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या