त्याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम युजर्सला Instagram वर ग्रुप चॅटमध्ये पोल बनवण्याची सुविधाही देईल.
मुंबई , 07 फेब्रुवारी: इन्स्टाग्राम (Instagram) हा सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. आज जगभरात इन्स्टाग्रामचे अब्जावधी युझर्स आहेत. इन्स्टाग्राम रील्स (Reels), फोटोजच्या माध्यमातून खासगी जीवनातल्या गोष्टी, माहिती, मनोरंजनपर कंटेंट शेअर केला जातो. 2021 मध्ये इन्स्टाग्रामने युझर्सना त्यांच्या पोस्टवरच्या लाइक्स (Like) लपवण्याचा अर्थात हाइड (Hide) करण्याचा ऑप्शन दिला. आपली पोस्ट किती जणांनी लाइक केली हे अन्य फॉलोअर्सना किंवा युझर्सना समजू नये, यासाठी हा ऑप्शन वापरला जातो. युझर्स एका किंवा सर्व पोस्टसाठी हा ऑप्शन वापरू शकतात. तसंच पोस्ट शेअर करण्यापूर्वी किंवा शेअर केल्यानंतर युझर हा ऑप्शन वापरू शकतो. इन्स्टाग्रामवरचे लाइक्स आणि व्ह्यू काउंट (how to hide View Count on instagram) लपवण्यासाठी युझर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. याविषयीची माहिती `एबीपी न्यूज लाइव्ह`ने प्रसिद्ध केली आहे. यासाठी इन्स्टाग्रामने विशेष फीचर (new feature of Instagram) उपलब्ध करून दिलं आहे. पोस्टवरचे लाइक काउंट हाइड करणं काही युझर्ससाठी फायद्याचं, तर काही युझर्ससाठी तोट्याचं ठरू शकतं. सध्या ट्रेंडिंग (Trending) किंवा पॉप्युलर (Populer) काय आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक जण पोस्टवरच्या लाइक काउंटचा वापर करतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आम्ही हा ऑप्शन उपलब्ध करून दिल्याचं कंपनीनं ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. Shocking: ऑर्डर केला 1.5 लाखांचा iPhone, डिलीव्हर झालेल्या वस्तूने युजर हैराण तुम्हाला तुमच्या सर्व पोस्टवरचे लाइक्स आणि व्ह्यू काउंट हाइड करायचा असेल तर सर्वप्रथम स्मार्टफोनवर इन्स्टाग्राम अॅप सुरू करावं. खालच्या बाजूस उजव्या कॉर्नरवरील आयकॉनवर टॅप करून आपल्या प्रोफाइलमध्ये (Profile) जावं. त्यानंतर तीन लाइन्सच्या आयकॉनवर टॅप करा आणि सेटिंग्जवर टॅप करा. आता प्रायव्हसी ऑप्शनवर (Privacy) टॅप करा. त्यानंतर मेन्यूतल्या पोस्टवर टॅप करा. त्यानंतर Hide Like and View Counts या बटणावर क्लिक करा. ही प्रोसेस केल्यावर तुम्ही सर्व पोस्टवरचे लाइक्स आणि व्ह्यू काउंट लपवू शकता. जुन्या पोस्टवरचे लाइक्स, व्ह्यू काउंट लपवण्यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनवर इन्स्टाग्राम अॅप सुरू करा. खालच्या बाजूस उजव्या कॉर्नरवरच्या आयकॉनवर क्लिक करून तुमचं प्रोफाइल ओपन करा. त्यानंतर ज्या पोस्टवरचा काउंट हाइड करायचा आहे, ती पोस्ट ओपन करा. त्यानंतर मेन्यूतल्या ‘हाइड लाइक काउंट’वर टॅप करा. पोस्टवरचा लाइक काउंट दर्शवायचा असेल तर थ्री-डॉट आयकॉनवर टॅप केल्यानंतर जो मेन्यू दिसेल, तिथे तुम्हाला हा ऑप्शन मिळेल. नव्या पोस्टवरचे लाइक आणि व्ह्यू काउंट हाइड करण्यासाठी अॅपच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यासाठी इमेज किंवा व्हिडिओ सिलेक्ट करा. ज्या पेजवर तुम्हाला कॅप्शन लिहिण्याचा पर्याय उपलब्ध असतो, तिथेच खाली असलेल्या Advance Settings या ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर `हाइड लाइक्स अँड व्ह्यू काउंट ऑन धिस पोस्ट` यावर क्लिक करा.