JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी Instagram चं खास फीचर, तुम्हाला माहितेय का याबद्दल?

मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी Instagram चं खास फीचर, तुम्हाला माहितेय का याबद्दल?

कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी ऑनलाइन (online) झाल्या आहेत. मुलांचे क्लास ऑनलाइन भरत आहेत, त्यामुळे पालक मुलांना फोन घेऊन देत आहेत. त्यामुळे मुलं अभ्यासाशिवाय फोनवर जास्त वेळ घालवत आहेत. शिवाय मुलांना वयानुसार, त्यांच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा समज नसल्याने ते अनेक अ‍ॅडल्ट साईट्स किंवा पेजेस फॉलो करू लागले आहेत.

जाहिरात

रील शेअर करण्यासाठी Preview बटणावर क्लिक करा. त्यानंतर शेअर बटणावर क्लिक करा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मार्च-   कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी ऑनलाइन (online) झाल्या आहेत. मुलांचे क्लास ऑनलाइन भरत आहेत, त्यामुळे पालक मुलांना फोन घेऊन देत आहेत. त्यामुळे मुलं अभ्यासाशिवाय फोनवर जास्त वेळ घालवत आहेत. शिवाय मुलांना वयानुसार, त्यांच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा समज नसल्याने ते अनेक अ‍ॅडल्ट साईट्स किंवा पेजेस फॉलो करू लागले आहेत. याचं वाढतं प्रमाण आणि मुलांची ऑनलाइन सुरक्षितता (online safety) या गोष्टी लक्षात घेऊन इन्स्टाग्रामने (Instagram) एक नवीन फिचर आणलंय. या फिचरमुळे पालकांना त्यांची मुलं इन्स्टाग्रामवर कोणते पेज किंवा कुणाला फॉलो करतात, याची माहिती मिळेलच तसेच ते इन्स्टाग्रामवर किती वेळ घालवतात, याचीदेखील माहिती मिळेल. फेसबुकचे मालक मेटा प्लॅटफॉर्म्स इंक (Facebook owner Meta Platforms Inc ) पालकांना त्यांची मुलं इंस्टाग्रामवर किती वेळ घालवत आहेत, हे ट्रॅक करण्याची परवानगी देणार आहे. लवकरच क्वेस्ट व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटवर (Quest virtual reality headsets) पालकांच्या देखरेखीचं फिचर (parental supervision features) आणणार आहे, असं कंपनीने बुधवारी सांगितलं. मेटाने सोशल मीडिया अॅप्स वापरणाऱ्या मुलांचं संरक्षण करण्याचं वचन दिलं होतं, त्याचा एक भाग म्हणून हे नवीन फिचर आणलं गेलंय. एका व्हिसलब्लोअरने एक इंटर्नल डॉक्युमेंट लीक (whistleblower leaked internal documents) केल्यावर कंपनीला याची जाणीव झाली होती की, Instagram मुळे काही किशोरवयीन मुलींच्या फोटोंसंबंधीत काही समस्या निर्माण झाल्या होत्या. लीक झालेल्या डॉक्युमेंटमुळे झालेल्या गोंधळामुळे इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांना डिसेंबरमध्ये काँग्रेससमोर मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. याबद्दल बोलताना आपण मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेची काळजी घेत आहोत, अशी साक्ष त्यांनी दिली होती. दरम्यान, ‘हे इंस्टाग्राम सुपरव्हिजन टूल्स बुधवारपासून युनायटेड स्टेट्समध्ये उपलब्ध झाले असून येत्या काही महिन्यांत ते जागतिक स्तरावर रोल आउट होतील,’ असं मेटाने सांगितलं. (हे वाचा: Google Pay द्वारे किती रुपये ट्रान्सफर करता येतात? काय आहे एका दिवसाचं लिमिट ) या नवीन फिचरमुळे पालक त्यांची मुले कोणते अकाउंट फॉलो करतात हे पाहू शकतील आणि त्यांची मुलं अॅपवर किती वेळ घालवतात, यासाठी वेळ मर्यादादेखील सेट करू शकतील. शिवाय मे महिन्यात मेटा एक डॅशबोर्ड (dashboard ) लाँच करेल, ज्यामध्ये त्याच्या क्वेस्ट हेडसेटसाठी सुपरव्हिजन टूल्स (supervision tools for Quest headsets) समाविष्ट असतील आणि क्वेस्टवर मुलांच्या वयासाठी अयोग्य असलेले अॅप्स त्यांना डाउनलोड करण्यापासून (downloading age-inappropriate apps on Quest) त्यांना आपोआप ब्लॉक करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या