Whatsapp Call Recording: व्हॉट्सअॅपने कॉल रेकॉर्डींगसाठी कोणतंही अधिकृत फिचर किंवा मार्ग उपलब्ध केलेला नाही. परंतु एका मार्गाने तुम्ही व्हॉट्सअॅपवर येणारे कॉल रेकॉर्ड करू शकता.
व्हॉट्सअॅपने कॉल रेकॉर्डींगसाठी कोणतंही अधिकृत फिचर किंवा मार्ग उपलब्ध केलेला नाही. परंतु एका मार्गाने तुम्ही व्हॉट्सअॅपवर येणारे कॉल रेकॉर्ड करू शकता.
चॅटींग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर येणारे कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला एका थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागेल.
तुम्हाला Call Recorder Cube ACR या अॅपची मदत घ्यावी लागेल. गुगल प्ले स्टोरवरून तुम्ही हे अॅप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
नंतर फोनच्या सेटींगमध्ये जाऊन एक्सेसेबिलीटी ऑप्शनमध्ये अॅप कनेक्टर इनेबल करा. जरुरी पर्मिशन दिल्यानंतर व्हॉट्सअॅप कॉल्स ऑप्शनवर ऑन करावं लागेल.
तुम्हाला हवं असल्यास ऑटो रेकॉर्डींग किंवा मॅन्युअल रेकॉर्डीगच्या माध्यमातून तुम्ही कॉल रेकॉर्डींग करू शकता..