JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Whatsapp Uninstall किंवा चॅट क्लिअर केल्यानंतर Backup कसा घ्यायचा?

Whatsapp Uninstall किंवा चॅट क्लिअर केल्यानंतर Backup कसा घ्यायचा?

तुम्ही व्हॉटसअॅप अनइन्स्टॉल केले किंवा चॅट क्लिअर झाले तर पुन्हा त्याचा बॅकअप कसा घ्यायचा हे जाणून घ्या.

जाहिरात

स्टेप 1- सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणारा नंबर सर्च करा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सध्या मेसेज, कॉल किंवा व्ह़िडिओ कॉलसाठी सर्वाधिक व्हॉटस्अॅपचा वापर केला जातो. यावर अनेक नवनवीन अपडेट्स येत असतात. अॅप अपडेट केलं की नवीन फीचर्स युजरसाठी उपलब्ध होतात. सुरुवातीला फक्त मेसेजपुरतं मर्यादित असणारं हे अॅप प्रचंड लोकप्रिय झालं. अॅडिओ कॉल, व्हिडिओ कॉलची सुविधा आल्यानंतर ग्रुप कॉलिंगचे फीचरही दिलं गेलं. फक्त कॉल आणि मेसेज नाही तर डॉक्युमेंट, फोटो, व्हिडिओसुद्धा पाठवता येत असल्यानं मेलला पर्याय म्हणूनही व्हॉटस्अॅपचा वापर वाढला आहे. फक्त मेसेजिंग अॅप म्हणून लाँच करण्यात आलेलं व्हॉटसअॅपने अल्पावधितच लोकप्रियता मिळवली. सध्या जगात सर्वाधिक वापर या अॅपचा केला जातो. नुकतंच व्हॉटस्अॅपने 1 फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. काही मोबाईलच्या मॉडेल्समधून आता Whatsapp हद्दपार होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्या मोबाइलमध्ये व्हॉटस्अॅप चालणार नाही त्यांना नव्या मोबाइलमध्ये व्हॉटस्अॅप सुरू करावं लागेल. नवीन मोबाईल घेतल्यावर किंवा दुसऱ्या मोबाइलमध्ये व्हॉटस्अॅप इन्स्टॉल करताना ऑनलाइन बॅकअप घेतला असेल तर अपडेट होतो. पण त्यातही लेटेस्ट अपडेट आपण घेतलेलं नसल्यास जिथपर्यंतचे चॅट हिस्ट्री अपडेट आहे तेवढीच रिस्टोअर होते. व्हॉटसअॅपच्या सेटिंगमध्ये  बॅकअप मोबाइलवर सेव्ह करण्यासाठी पर्याय आहेत. तुम्ही जर ऑनलाइनऐवजी ऑफलाइन बॅकअप सेटिंग केलं असेल तर स्मार्टफोनच्या इंटर्नल मेमरीमध्ये WhatsApp/Databases फोल्ड़रमध्ये msgtsore.db.crypt12 अशी एक अपडेटेड फाइल असते. त्यामध्ये सर्व चॅटिंग हिस्ट्री सेव्ह होते. तुम्ही फोनमधून व्हॉटस्अॅप अनइन्स्टॉल करण्यापूर्वी तसेच फोनमधील डेटा डिलीट करण्यापूर्वी msgtsore.db.crypt12 फाइल इतरत्र सेव्ह करून घ्या. ज्या फोनमध्ये इन्स्टॉल करणार आहात त्यावर सेंड करा. कॉपी केलेली फाइल ज्या मोबाइलमध्ये व्हॉटसअॅप इन्स्टॉल करणार आहात त्याच्या इंटर्नल मेमरीत WhatsApp फोल्डरमध्ये Databases फोल्डर तयार करून त्यामध्ये  सेव्ह करा. त्यानंतर व्हॉटसअॅप इन्स्टॉल करताना तुमच्या मोबाईलवर सेव्ह केलेला बॅकअप आपोआप रिस्टोअर होतो. तुम्ही चॅट क्लिअर केले असले तरी या पद्धतीनेच बॅकअप घेता येतो. यासाठी msgtsore.db.crypt12  ही फाइल किंवा ऑनलाइन बॅकअप सेव्ह असणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या