JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Car Maintenance Tips: घरच्या घरी चेक करू शकता कारचे ब्रेक पॅड, करावं लागेल ‘हे’ काम

Car Maintenance Tips: घरच्या घरी चेक करू शकता कारचे ब्रेक पॅड, करावं लागेल ‘हे’ काम

check break pads of car at home: ब्रेक पॅड हा कारचा महत्त्वाचा घटक आहे, जो कार चालविताना वारंवार वापरला जातो. ब्रेक पॅडची गुणवत्ता चांगल्या ब्रेकिंग सिस्टमसाठी महत्त्वाची असते.

जाहिरात

घरच्या घरी चेक करू शकता कारचे ब्रेक पॅड, करावं लागेल ‘हे’ काम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जुलै: आपण आपल्या कारची खूप काळजी घेत असतो. परंतु तरीही  बर्‍याचदा काही महत्त्वाच्या गोष्टींची समज आपल्याला नसते. त्यामुळं आपल्याकडून काळजी घेताना काही चुका होतात. ब्रेक पॅड हा कारचा महत्त्वाचा घटक आहे, जो कार चालविताना वारंवार वापरला जातो. ब्रेक पॅडची गुणवत्ता चांगल्या ब्रेकिंग सिस्टमसाठी महत्त्वाची असते. जर ब्रेक पॅड खराब झाले तर आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो. अशा ब्रेक पॅड खराब (How to check break Pads of Car) झाल्यामुळे ब्रेक फेल होऊ शकतात, जे जीवावर बेतू शकतं. आपल्या कारचे ब्रेक पॅड योग्य पद्धतीनं काम करत आहेत की नाही हे हे आपण तपासू शकतो. आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ब्रेक पॅड सहजपणे तपासू शकता. कार पार्क करा आणि ब्रेक थंड होऊ द्या- ब्रेक पॅड चेक करण्यातील पहिली पायरी म्हणजे सपाट जागेवर कार पार्क करणे आणि ब्रेकला थंड होऊ देणं. कारमधून केलेली एक छोटीशी ट्रिपदेखील ब्रेक मोठ्या प्रमाणात गरम करू शकते. म्हणूनच ते चेक करण्यापूर्वी त्यांना थंड होऊ द्यायला हवं. ब्रेक थंड होण्यास किमान एक तास लागतो. हेही वाचा-  Electricity bill: वीजबिल येईल 3 हजार रुपयांनी कमी! ताबडतोब घरातून काढा ‘हे’ डिव्हाइस चाके खोला आणि ब्रेक पॅड तपासा- एकदा ब्रेक पुरेसे थंड झाल्यावर ब्रेक पॅड तपासण्यासाठी चाके खोला. ब्रेक पॅडवर धूळ जमा होणं सामान्य आहे. जसजशी ब्रेक पॅड खराब होत जातात, ब्रेक डस्टचं प्रमाण कमी होत जातं. जर चाकं स्वच्छ दिसत असतील, तर हे सूचित होतं की ब्रेक पॅड बदलण्याची आवश्यकता आहे. चाक न काढता असं तपासा ब्रेक पॅड- बर्‍याच कारमध्ये, ब्रेक पॅड्स चाकाच्या छिद्रातून दिसू शकतात. ब्रेक पॅडची स्थिती तपासण्यासाठी त्याची जाडी तपासणे आवश्यक आहे. ब्रेक पॅड व्यवस्थित पाहण्यासाठी फ्लॅशलाइट वापरा. जर ती त्यांच्या जाडीच्या एका चतुर्थांशपेक्षा कमी दिसत असतील तर त्यांना बदलण्याची वेळ आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या