JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कोरोनाच्या संकटात भारतात Google वर वेगळाच मुद्दा झाला सर्च, जूनमध्ये ट्रेंडच बदलला

कोरोनाच्या संकटात भारतात Google वर वेगळाच मुद्दा झाला सर्च, जूनमध्ये ट्रेंडच बदलला

सध्या लोकांचा काय मूड आहे याचा गुगलच्या सर्च ट्रेंडने खुलासा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 जून : गूगलवर काय ट्रेंड (Google trend) होत आहे आणि लोक सगळ्यात जास्त काय वाचतात हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. काही लोकांमध्ये याची कामालीची उत्सुकताही असते. सध्या लोकांचा काय मूड आहे याचा गुगलच्या सर्च ट्रेंडने खुलासा केला आहे. जूनमध्ये लोकांनी कोरोनाव्हायरसबद्दल, ‘कोरोनाव्हायरस कमकुवत होत आहे?’, ‘कोरोनोव्हायरस (coronavirus) लस भारतात कधी येईल?’ आणि ‘कोरोनोव्हायरस कधी संपेल का? या प्रकारच्या माहितीसाठी शोध घेतला आहे. पण मे महिन्याच्या तुलनेत हा शोध बर्‍यापैकी कमी झाला आहे. जूनमध्ये लोकांनी साइटवर सर्वाधिक बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतबद्दल सर्च केलं आहे. BREAKING : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर सुरू, हे रस्ते केले बंद मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये सर्च बदलला मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोनाबद्दल लोकांनी चर्च करणं कमी केलं आहे. यामध्ये 66% घट झाली आहे. गुरुवारी गुगलने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंहबद्दस जास्त प्रमाणात सर्च केलं गेलं आहे. त्यानंतर, या यादीमध्ये सूर्यग्रहण दुसर्‍या क्रमांकावर होतं आणि त्यानंतर फादर्स डे विषयी लोकांनी माहिती सर्च केली आहे. अन् गृहमंत्र्यांनी उदयनराजे भोसले यांना केला मुजरा, या गाण्यासह VIDEO व्हायरल कोरोनाच्या लस झाली सगळ्यात जास्त सर्च गुगलने दिलेल्या आकडेवारीनुसार असं दिसून आलं की, भारतीय नेटिझन्स सध्याच्या परिस्थितीत कोरोना लसीबाबत बरेच प्रश्न विचारत आहेत. जूनमध्ये ‘कोरोनाव्हायरस न्यूज’ अव्वल ट्रेंडिंग होतं. देशात संक्रमित लोकांची संख्या 6 लाख 25 हजार 544 पर्यंत वाढली आहे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 18,213 झाली आहे. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या