JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Apple watchच्या 'या' फीचरमुळे वाचले 61 वर्षीय भारतीय व्यक्तीचे प्राण

Apple watchच्या 'या' फीचरमुळे वाचले 61 वर्षीय भारतीय व्यक्तीचे प्राण

मागील वर्षी लाँच झालेल्या Apple Watch Series 5 मध्ये ECG (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) हे फीचर देण्यात आलं आहे. त्याचमुळे इंदौरमधील एका 61 वर्षीय व्यक्तीचा प्राण वाचवण्यास मदत झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : Apple watchने इंदौरमधील एका 61 वर्षीय व्यक्तीचा जीव वाचवला असल्याची घटना समोर आली आहे. Appleचे CEO टिम कुक यांनी आपल्या ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. मागील वर्षी लाँच झालेल्या Apple Watch Series 5 मध्ये ECG (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) हे फीचर देण्यात आलं आहे. त्याचमुळे इंदौरमधील एका 61 वर्षीय व्यक्तीचा प्राण वाचवण्यास मदत झाली आहे. इंदौरमध्ये राहणारे राजहंस हे गृहस्थ रिटायर्ड असून ते Apple Watch Series 5 युजर आहेत. त्यांना त्यांच्या हावर्ड यूनिव्हर्रसिटीचा विद्यार्थी असणाऱ्या मुलाने हे घड्याळ भेट दिलं होतं. यावर्षी मार्च महिन्यात त्यांची तब्येत बिघडली होती. त्यावेळी त्यांनी ऍपलच्या घडाळ्यातील हे ECG फीचर चेक केलं. त्यांच्या मुलाने सिद्धार्थने सांगितलं की, Apple Watch मध्ये ECG फीचर असल्याने, आपल्या वडिलांना ECG रेग्यूलरली चेक करण्यासाठी हे वॉच गिफ्ट केलं होतं. वडिल आजारी असताना, त्यावेळी रात्री त्यांनी तीन-चार वेळा ECG चेक केलं. त्यादरम्यान, Apple Watchच्या ECG फीचरमध्ये एरथमिया सिग्नल आणि असामान्य हार्टबिट असल्याचं निदर्शनास आलं. या वॉचमध्ये सतत हाच रिझल्ट आल्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क केला. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्यानंतर, त्यांना त्वरित शस्त्रकिया करण्याची गरज असल्याचं सांगितलं. राजहंस यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या मुलाने, सिद्धार्थने Apple CEO Tim Cook यांना संपूर्ण प्रकाराबाबत ई-मेल केला. त्यावर टिम कुक यांनी रिप्लायही केला. हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद मानत, तुमच्या वडिलांना वेळेवर मेडिकल अटेंशन मिळालं, याचा आनंद असल्याचं कुक म्हणाले. त्यानंतर ऍपलची एक टीम सिद्धार्थचे वडील राजहंस यांच्या संपर्कात होती. मागील वर्षीही Apple Watchच्या फॉल डिटेक्शन फीचरमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला होता. 2018 मध्येही पुण्यातील एका 53 वर्षीय वकील महिलेने टिम कुक यांना लाईफ चेंजिंग मोमेंटबद्दल ई-मेल करत, धन्यवाद दिले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या