Apple ने iPhone 11 लाँच केल्यानंतर iPhone XS, iPhone XR, iPhone 8 या फोनची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
Apple ने iPhone 11 सिरीज मंगळवारी लाँच केली. आता प्रत्यक्ष बाजारात हे फोन कधी उपलब्ध होतील याची उत्सुकता ग्राहकांना लागून राहिली आहे. कॅलिफोर्नियात झालेल्या कार्यक्रमात iPhone11 लाँच करण्यात आला.
नवे फोन लाँच झाल्यानं जुन्या फोनची किंमत घसरली आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या फोनची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
iPhone XR 64GB 49,900 रुपयांत तर 128GB फोन 54,900 रुपयांत मिळत आहे. याची आधीची किंमत अनुक्रमे 59 हजार आणि 64 हजार रुपये इतकी होती.
एक लाख 14 हजार रुपये किंमतीचा iPhone XS 256GB आता एक लाख 3 हजार रुपयांत मिळत आहे. तर iPhone XS 64GB 89,900 रुपयांत मिळतो.
iPhone X 64GB आता 91,900 रुपयांत तर 256 जीबी क्षमतेचा iPhone X हा एक लाख 6 हजार रुपयांत उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी लाँच झालेल्या फोनशिवाय आयफोन 8 आणि 8 प्लस यांच्याही किंमती कमी झाल्या आहेत. 8 प्लस 64 जीबी फोन 69 हजार रुपयांवरून 49 हजार इतका झाला आहे. या फोनची किंमत 20 हजार रुपयांनी कमी झाली आहे.
आयफोन 7 प्लस 32 जीबी 49 हजार रुपयांवरून 37 हजार 900 रुपये इतका झाला आहे. तर 128 जीबी 42 हजार रुपयांत उपलब्ध आहे.
iPhone 7 32 जीबी 10 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. 39 हजार रुपयांवरून त्याची किंमत 29 हजार रुपये झाली आहे.
भारतात आयफोन 11 ची किंमत 64,900 रुपये असेल तर iPhone11 Pro 99,900 रुपये आणि Pro Max ची किंमत 1,09,900 इतकी असणार आहे.