JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जगात भारी कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

जगात भारी कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

अवघ्या महाराष्ट्राची शान असलेली कोल्हापुरी चप्पल आता ऑनलाईनही मिळणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे आा वापरायला सोपी आणि रॉयल टच देणारी कोल्हापुरी चप्पल आपल्याला घरबसल्या मिळणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 13 ऑक्टोबर: अवघ्या महाराष्ट्राची शान असलेली कोल्हापुरी चप्पल आता अ‍ॅमेझॉनवरही उपलब्ध आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली. कोल्हापुरी चपलेला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाईन प्रोडक्ट विक्री या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. आता बचत गटातील महिलांनी, तसंच कारागिरांनी बनवलेल्या कोल्हापुरी चपलांना आंतराराष्ट्रीय बाजारपेठेची दारं उघडली आहेत. ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण करुन त्यांचं जीवनमान उंचावणे हा या मोहिमेचा मुळ उद्देश आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत, योजना राबवण्यात येत आहे. ‘उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ असं या योजनेचं नाव आहे.

संबंधित बातम्या

कोल्हापूरी चपलेसोबत, गुळ, काकवी, दागिने, मध, विविध प्रकारचे मसाले, अशा छोट्या उद्योगांनाही ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे असं मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या