JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / वर्ल्ड कप विजेत्या भारतीय कोचवर धक्कादायक आरोप, आंतरराष्ट्रीय खेळाडूने सोडलं क्रिकेट

वर्ल्ड कप विजेत्या भारतीय कोचवर धक्कादायक आरोप, आंतरराष्ट्रीय खेळाडूने सोडलं क्रिकेट

झिम्बाब्वेच्या टेस्ट टीमचा कर्णधार सीन विलियम्स (Sean Williams) याने प्रशिक्षक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) यांच्यावर गंभीर आरोप करत, क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.

जाहिरात

भारतीय कोचवर आरोप करत क्रिकेटपटूने घेतला ब्रेक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट : झिम्बाब्वेच्या टेस्ट टीमचा कर्णधार सीन विलियम्स (Sean Williams) याने प्रशिक्षक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) यांच्यावर गंभीर आरोप करत, क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. लालचंद राजपूत ड्रेसिंग रूममधलं वातावरण खराब करत आहेत. ड्रेसिंग रूममध्ये पाठीमागे खूप गोष्टी बोलल्या जात आहेत, असं सीन विलियम्स म्हणाला आहे. लालचंद राजपूत यांच्यामुळे आपण क्रिकेटमधून विश्रांती घेत असल्याचं विलियम्सने सांगितलं आहे. झिम्बाब्वेची टीम सध्या आयर्लंडच्या (Zimbabwe vs Ireland) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 5 टी-20 आणि 3 वनडे होणार आहेत, यानंतर स्कॉटलंडविरुद्धही 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. सीन विलियमसनने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून माघार घेतली आहे. पण तो वनडे सुपर लीगचा भाग असलेल्या वनडे सीरिजमध्ये खेळणार आहे. यानंतर तो क्रिकेटमधून विश्रांती घेणार आहे. ‘लालचंद राजपूत यांच्या प्रशिक्षणात मला पुढचा मार्ग दिसत नाही. टीममधलं वातावरण खराब झालं आहे. पाठीमागून केल्या जाणाऱ्या चर्चांमुळे टीममध्ये विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही,’ असं सीन विलियम्स झिम्बाब्वेच्या स्टार एफएमशी बोलताना म्हणाला. 2005 साली विलियम्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ‘मला नव्या खेळाडूंच्या भवितव्याबाबत चिंता आहे. क्रिकेट चालवणारी यंत्रणा बदलली नाही, तर देशाचं क्रिकेट धोक्यात येईल,’ अशी प्रतिक्रिया सीन विलियम्सने दिली. लालचंद राजपूत यांच्या कोचिंगमध्ये झिम्बाब्वेने मागच्या 3 वर्षात फक्त 4 वनडे मॅच जिंकल्या. हे सगळे विजय युएईविरुद्ध आले आहेत. वनडे सुपर लीगच्या पॉईंट्स टेबलमध्ये झिम्बाब्वेची टीम अखेरच्या स्थानावर आहे, त्यामुळे 2023 वर्ल्ड कपसाठी त्यांना थेट क्वालिफाय होणं कठीण आहे. आयर्लंड आणि स्कॉटलंड दौऱ्यात क्रेग एरव्हाईन झिम्बाब्वेचं नेतृत्व करेल. 2020 नंतर एरव्हाईन झिम्बाब्वेचा पाचवा कर्णधार आहे. 2007 साली एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्या वर्ल्ड कपमध्ये लालचंद राजपूत टीम इंडियाचे मॅनेजर होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या