JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / खेळत राहा, शाब्बास! ओव्हलवर मराठमोळा संवाद, रहाणेने शार्दुलला मायबोलीतून दिल्या टिप्स

खेळत राहा, शाब्बास! ओव्हलवर मराठमोळा संवाद, रहाणेने शार्दुलला मायबोलीतून दिल्या टिप्स

मराठमोळ्या अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर यांनी लंडनच्या ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना मराठीत केलेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जाहिरात

ajinkya rahane and shardul thakur

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 10 जून : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने कसोटीवर पकड मजबूत केली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारताचा मधल्या फळीतला फलंदाज अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याने चिवट खेळी करत 89 धावा केल्या. याशिवाय सातव्या गड्यासाठी त्याने शार्दुल ठाकुरसोबत शतकी भागिदारी केली. त्यांच्या या भागिदारीमुळे भारताने फॉलोऑन टाळला. आता त्यांच्या या भागिदारीवेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईकर असलेल्या दोन्ही खेळाडूंनी ओव्हलच्या मैदानात मराठीमध्ये केलेला संवाद ऐकू येतो. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची आघाडीची फळी स्वस्तात तंबूत परतली. एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 71 अशी झाली होती. तेव्हा रहाणेने जडेजासोबत अर्धशतकी भागिदारी केली. जडेजा बाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एस भरत दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. तेव्हा भारताची धावसंख्या 6 बाद 152 अशी झाली होती. WTC Final : ड्रेसिंग रूमबाहेर खुर्चीत झोपलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज, सिराजने उडवली झोप   शार्दुल ठाकुर मैदानात आल्यानंतर अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यावर एकेरी दुहेरी धावा काढल्या. दोघांनी संघाच्या दोनशे धावा फलकावर लावल्या. पडझड रोखून त्यांनी शतकी भागिदारी केली. यावेळी मैदानात अजिंक्य रहाणे शार्दुल ठाकुरचं कौतुक करताना त्याला घाई न करण्याचा सल्ला देतो. शिवाय मैदानात ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षणात केलेला बदलही शार्दुलला सांगतो. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी दोघांचेी कौतुक केलं आहे.

तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने कसोटीवर पकड मजबूत केलीय. भारताकडून अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके केल्याने डाव सावरला. अजिंक्य रहाणेने 89 तर शार्दुलने 51 धावा केल्या. दोघांनी सहाव्या गड्यासाठी महत्त्वाची अशी शतकी भागिदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या