farmers in delhi
दिल्ली, 8 मे : दिल्लीत जंतर-मंतरवर कुस्तीपट्टूंचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी जंतर-मंतर इथं पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडले. दुसऱ्या बाजूला कुस्तीपट्टूंनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. कुस्तीपट्टूंच्या समर्थनासाठी रविवारी शेतकरी दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचले होते. यात अनेक शेतकरी नेत्यांचाही समावेश होता. यावेळी संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला इशारा दिला होता. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं होतं की, आरोपी बृजभूषण शरण सिंहला 21 मे पर्यंत अटक व्हायला हवी. राजस्थानमध्ये हवाई दलाचं मिग-21 विमान कोसळलं, दोन महिलांचा मृत्यू
राकेश टिकैत म्हणाले होते की, सरकारने बृजभूषण सिंह यांना 21 मे पर्यंत अटक करावी आणि आमच्या मुलींना न्याय द्यावा. हा खूप मोठा मुद्दा आहे. यावर कोणतंही राजकारण होऊ नये. जर असं झालं नाही तर पुढच्या रणनितीबद्दल आम्ही काही निर्णय घेऊ. दरम्यान, विनेश फोगाटने म्हटलं होतं की, पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. पण कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवून घेतलेला नाही. आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर २१ मे रोजी निर्णय घेतला जाईल. तसंच पैलवानांचे हे आंदोलन कुणी हायजॅक केलेलं नाही असंही तिने स्पष्ट केलं होतं.