दिल्ली, 07 मे : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिग्गज पैलवानांचे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. या पैलवानांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं की, जर माझ्याविरोधातला एक जरी आरोप सिद्ध झाला तरी गळफास घेईन. बृजभूषण सिंह म्हणाले की, माझंही म्हणणं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळेच हा व्हिडीओ तयार करत आहे. ही जी मुलं माझ्यावर आरोप करतायत ती दिवसही सांगू शकत नाहीत, कोणता दिवस होता, कोणती तारीख होती? जी लढाई मी लढत आहे ती तुमच्या ज्युनिअर मुलांसाठी लढतोय. या पैलवानांना सगळं मिळालं आहे पण जी गरीब घरातली मुलं आहेत त्यांना सांगेन की ही लढाई तुम्हा मुलांसाठी आहे. दिनेश कार्तिकची एक चूक RCBला पडली महागात, दिल्लीने सहज जिंकला सामना पैलवानकी करणाऱ्या कोणत्याही मुलीला विचारा की हे आरोप खरे आहेत का? जर मुलींनी हो म्हटलं तर जे हवं ते करा. या प्रकरणाचा तपास संपेल कारण मी स्वत:ला ओळखतो. 12 वर्षात मी कोणाकडेही चुकीच्या नजरेनं पाहिलं नाही. मी चार महिन्यांपासून लोकांच्या शिव्या ऐकतोय. पहिल्या दिवशीही मी हेच म्हटलं होतं की जर एक जरी आरोप सिद्ध झाला तरी मी फासावर लटकेन. आजही हेच बोलतोय. शनिवारी हरयाणातील सोनीपतमध्ये लववंशीय खत्री खाप व जटवाडा ३६० खापने दिल्लीतील पैलवानांना पाठिंबा दिला होता. दोन्ही खाप पंचायतींकडून इशारा देण्यात आला होता की, जर सरकारने आरोपी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही तर शेतकरी आंदोलनावेळी दिल्ली जशी जाम केली तसंच पुन्हा एकदा करू.