दक्षिण आफ्रिकेत महिला क्रिकेटचे दिवस पालटले
मुंबई, 26 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आज फायनल सामना पारपडणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना पारपडणार असून संपूर्ण जगाच लक्ष आज या सामन्याकडे लागले आहे. यात ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य संघ सहाव्यांदा महिला टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी मैदानात उतरेल. तर प्रथमच महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचा फायनल सामन्यात पोहोचलेला दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ ट्रॉफी जिंकून इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने गुरुवारी पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताला 5 धावांनी पराभूत करून फायनलमध्ये धडक दिली. तर शुक्रवारी दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात इंग्लंडला 6 धावांनी हरवून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पहिल्यांदाच फायनल सामन्यापर्यंत मजल मारून इतिहास घडवल्याने आता दक्षिण आफ्रिकेतील जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
महिला टी 20 वर्ल्ड कपची फायनल गाठल्यानंतर नेहमी महिला क्रिकेटला दुय्यमस्थान देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांनी आपल्या महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी फायनल सामन्याचे तिकीट काढण्याकरता एकच गर्दी केली. परंतु काही क्षणात ही सर्व तिकीट विकली गेल्याने तिकीट खिडक्यांबाहेर Sold Out चे बोर्ड लागले. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
दक्षिण आफ्रिकेच्या काही नागरिकांनी हे फोटो ट्विट करत दक्षिण आफ्रिकेत महिला क्रिकेटला अच्छे दिन येत असल्याचे म्हंटले आहे. तर एका ट्विटर युझरने फोटो पोस्ट करत लिहिले, ‘दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल सामना पाहण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून लोक रांगेत उभी आहेत. तिकिटांची अधिक मागणी असलयाने आयसीसीकडून 3 हजार अतिरिक्त तिकीट देण्यात आली आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्रच दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचे कौतुक होत आहे.