जोकोविच सलग पाचव्या विजेतेपदासाठी कोर्टवर
नवी दिल्ली, 16 जुलै : विम्बल्डन 2023 मध्ये महिला एकेरीत चेक रिपब्लिकच्या वोंड्रोसोवाने विजेतेपद पटकावलं तर पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेज यांच्यात सामना रंगणार आहे. विम्बल्डनचं सलग पाचवं जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने नोवाक जोकोविच आज कोर्टवर उतरेल. जगभरातील टेनिस प्रेमींचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. विम्बल्डन 2023 मध्ये विजेत्याला किती रक्कम मिळते माहिती आहे का? उपविजेत्याला किती पैसे मिळतात माहितीय का? IPL विजेत्या संघापेक्षा जास्त रक्कम विम्बल्डनमध्ये महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडुला मिळतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 11 टक्के जास्त प्राइज मनी मिळणार आहे. महिला आणि पुरुष एकेरीच्या विजेत्यांना 24.49 कोटी रुपये मिळतील. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्यांनाही मोठी रक्कम मिळणार आहे. वर्ल्ड कपआधी भारतासाठी 3 गूडन्यूज, दोन गोलंदाज फिट, एक फलंदाजही करणार पुनरागमन विम्बल्डन 2023 मध्ये उपविजेत्यांना 12.25 कोटी रुपये बक्षीसाची रक्कम मिळेल. याशिवाय स्पर्धेत खेळाडूंना एकूण जवळपास 465 कोटी रुपये रक्कम वाटली जाणार आहे. गेल्या वर्षी महिला आणि पुरुष चॅम्पियन्सना 20.85 कोटी रुपये बक्षीसाची रक्कम दिली होती. तर यावेळी रकमेत 11 टक्के वाढ केली आहे. 1967 पर्यंत विम्बल्डनमध्ये विजेत्यांना पैसे मिळत नव्हते. पुरुष एकेरीत गतविजेत्या नोवाक जोकोविचच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने एकूण सात विम्बल्डन ग्रँड स्लॅम जिंकली आहेत. सलग चार वेळा नोवाक विम्बल्डन चॅम्पियन आहे. यावेळी तो विजेतेपद कायम राखणार की अल्कारेज बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वोंड्रोसोवाने घडवला इतिहास मार्केटा वोंड्रोसोवा हिने विम्बल्डन 2023 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी (15 जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात वोंड्रोसोवाने ट्युनिशियाच्या ओन्स जेब्युरचा 6-4, 6-4 असा पराभव केला. बिगरमानांकित वोंड्रोसोवाच्या कारकिर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना 1 तास 20 मिनिटे चालला. 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोवा ही विम्बल्डन चॅम्पियन बनणारी ओपन एरामधील पहिली बिगरमानांकित महिला खेळाडू आहे.