टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास घडवला.
टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास घडवला. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) नीरजने भारताला स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. ऑलिम्पिक इतिहासातलं भारताचं हे दुसरं, तर ऍथलिटिक्समधलं पहिलं गोल्ड मेडल आहे. (Neeraj Chopra Instagram)
नीरज चोप्राच्या खेळासोबतच त्याच्या लूक आणि हेयरस्टाईलची चर्चाही जोरदार झाली. पण टोकयो ऑलिम्पिकसाठी नीरजने त्याचे केस कापले. याबाबतचं कारणही त्याने सांगितलं आहे. (Instagram)
स्पर्धेसाठी सराव करताना आपल्याला मोठ्या केसांमुळे अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे खेळाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना आपल्याला केस कापण्याचा सल्ला दिला. या कारणासाठी आपण केस कापल्याचं नीरज म्हणाला. (Instagram)
ऑलिम्पिकमधली ऐतिहासिक कामगिरी, हेयरस्टाईल आणि लूक यामुळे नीरजला बायोपिकसाठी विचारणा झाली नाही, तरच नवल. नीरजने मात्र आपण सध्या बायोपिक करणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. (Instagram)
सध्या आपलं लक्ष कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धा तसंच वर्ल्ड चॅम्पियनशीपवर आहे. खेळाडूचा बायोपिक त्याच्या निवृत्तीनंतरच यावा, असं आपलं मत असल्याचंही नीरज म्हणाला. (Instagram)
मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे बरेच व्हिडिओ मी बघितले. मला जे करता आलं नाही, ते एखाद्या भारतीयाने करावं, असं ते म्हणायचे. जेव्हा मी जिंकलो आणि राष्ट्रगीतासाठी उभा राहिलो तेव्हा मला मिल्खा सिंग याची आठवण आली, अशी भावनिक प्रतिक्रिया नीरजने दिली. (Instagram)
पीटी उषा (PT Usha) यांचं मेडल जिंकण्याचं स्वप्न 1984 साली अगदी थोड्या अंतराने हुकलं होतं. माझ्या कामगिरीनंतर पीटी उषाही आनंदी झाल्या असतील, असं नीरज म्हणाला. (Instagram)
भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजने ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. (Instagram)
टोकयो ऑलिम्पिकमधल्या या कामगिरीनंतर नीरजवर बक्षिसांचा पाऊस पडत आहे. वेगवेगळ्या संघटनांनी दिलेल्या पुरस्कारांमुळे नीरज आता करोडपती झाला आहे. (Instagram)
'नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल. तसंच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू. तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,' अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केली आहे.(Instagram)
बीसीसीआय (BCCI) नीरज चोप्राला 1 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली.(Instagram)
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांनी नीरज चोप्राला 2 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. (Instagram)
भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOC) नीरजला 75 लाख रुपये देणार आहे. आयपीएलमधली चेन्नई सुपरकिंग्स टीमने (CSK) नीरजला 1 कोटी रुपये जाहीर केले आहेत. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नीरज चोप्राला त्यांची आगामी XUV 700 भेट द्यायचं ठरवलं आहे. (Instagram)