वेस्ट इंडिजने तिसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा (West Indies vs Australia) 6 विकेटने पराभव केला. मॅचमधला हा विजय महान क्रिकेटपटू क्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर राहिला.
वेस्ट इंडिजने तिसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा (West Indies vs Australia) 6 विकेटने पराभव केला. याचसोबत त्यांनी 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. मॅचमधला हा विजय महान क्रिकेटपटू क्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर राहिला. त्याने 38 बॉलमध्ये 67 रनची खेळी केली. यातल्या 58 रन तर गेलने फोर आणि सिक्सच्या माध्यमातून केले.
2016 नंतर गेलचं आंतरराष्ट्रीय टी-20 मधलं हे पहिलं अर्धशतक होतं. याआधी त्याने मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक केलं होतं. गेलने त्याच्या विस्फोटक खेळीमध्ये 4 फोर आणि 7 सिक्स मारले. एवढच नाही तर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 14 हजार रनही पूर्ण केले. हा विक्रम करणारा तो जगातला एकमेव खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयानंतर क्रिस गेलने भावुक होत प्रतिक्रिया दिली. 'हा एक शानदार प्रवास होता. सीरिज जिंकल्यामुळे मी सर्वाधिक खूश आहे. मोठ्या टीमविरुद्ध आम्हाला हा विजय मिळाला. कायरन पोलार्डने महत्त्वाची भूमिका निभावली, जरी तो या सामन्यांमध्ये खेळत नसला,' असं गेल म्हणाला.
कायरन पोलार्डला दुखापत झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळत नाही. त्याच्याऐवजी निकोलस पूरनला टीमचं नेतृत्व देण्यात आलं. 'मी बॅटने संघर्ष करत होतो, यानंतर आज रन करताना चांगलं वाटलं. मी माझं अर्धशतक कायरन पोलार्डला समर्पित करतो, काारण तो नेहमीच माझ्यासोबत उभा राहिला,' अशी प्रतिक्रिया गेलने दिली. (Photo Chris Gayle Instagram)
मी या टीममध्ये कुठे आहे, ते पोलार्डने मला सांगितलं. तसंच मैदानात जाऊन व्यक्त होण्याचा सल्लाही त्याने मला दिला. यासाठी मी पोलार्डचा आभारी आहे, असं गेल म्हणाला. अनेकवेळा तुम्ही किती मोठे असता यामुळे काही फरक पडत नाही. तुम्हाला बोलणं गरजेचं होऊन जातं. हा पाठिंबा मला पोलार्ड आणि ब्राव्होने दिल्याचं वक्तव्य गेलने केलं. (Twitter/Punjab Kings)