JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अमित शाह मोटेरावर असताना भाजपचा बंगालमध्ये सिक्सर, या क्रिकेटपटूच्या हातात 'कमळ'

अमित शाह मोटेरावर असताना भाजपचा बंगालमध्ये सिक्सर, या क्रिकेटपटूच्या हातात 'कमळ'

एकीकडे अमित शाह क्रिकेटच्या मैदानात असताना भाजपने (BJP) पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये सिक्सर मारला. भारताचा माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा (Ashok Dinda) याने भाजपमध्ये प्रवेश केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 24 फेब्रुवारी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आले होते. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) आणि अमित शाह यांनी या नव्याने उभारण्यात आलेल्या स्टेडियमचं उद्घाटन केलं. मोटेरा स्टेडियम म्हणून ओळख असणाऱ्या या स्टेडियमचं नामांतर नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं. तसंच आपली 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांत शर्मा याचा अमित शाह यांनी विशेष सत्कार केला. एकीकडे अमित शाह क्रिकेटच्या मैदानात असताना भाजपने पश्चिम बंगालमध्ये सिक्सर मारला. भारताचा माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा (Ashok Dinda) याने भाजपमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीआधी दिंडा याने हातात भाजपचं कमळ घेतलं आहे. अशोक दिंडाची कारकीर्द अशोक दिंडाने 13 वनडेमध्ये 12 विकेट तर 9 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 17 विकेट घेतल्या. डिसेंबर 2009 साली श्रीलंकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमधून दिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर मे 2010 साली तो पहिली वनडे झिम्बाब्वेविरुद्ध खेळला. डिसेंबर 2012 मध्ये दिंडा शेवटची टी-20 तर जानेवारी 2013 साली तो शेवटची वनडे खेळला.

मनोज तिवारी तृणमूलमध्ये अशोक दिंडाच्या भाजप प्रवेशाआधी भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाचा माजी खेळाडू असलेला मनोज तिवारी बंगालच्या रणजी टीमचा कॅप्टन होता. तो अजूनही देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. ‘राजकारणाच्या कठीण पिचवर मी तृणमुल काँग्रेससाठी (TMC) बॅटिंग करणार आहे,’ अशी घोषणा तिवारीनं केली आहे. ‘मला फक्त नामधारी नाही, तर काम करणारा नेता व्हायचं आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी दीदींना एकटं सोडू शकत नाही.’ असं तिवारीनं यावेळी स्पष्ट केलं. मनोज तिवारीनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या राजकीय प्रवेशाची भूमिका सविस्तर मांडली आहे. ‘ मी बराच होमवर्क करुन राजकारणात उतरलो आहे. क्रिकेट खेळून मी बरंच काही मिळवलं. आता लोकांसाठी काम करण्याची वेळ आहे. मी गरिबी पाहिली असून गरिबांचं दु:ख काय असंत हे मला माहिती आहे.’ पेट्रोल आता 100 रुपये लीटरपर्यंत पोहचलं आहे. गरीब आणि शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. मी गरिबांचं कष्ट कमी करण्यासाठी काम करणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी आता सक्रीय राजकारणी होण्यासाठी राजकीय मैदानात उतरलो आहे,’ असं तिवारीनं स्पष्ट केलं. 2008 साली केलं होतं पदार्पण मनोज तिवारीनं 2008 साली टीम इंडियात पदार्पण केलं होतं. तो 2015 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. या काळात त्यानं 12 वन-डे आणि 3 T20 मॅच खेळल्या. 35 वर्षांच्या तिवारीनं वन-डे मध्ये 287 तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 15 रन केले. आयपीएलमध्ये देखील तो सक्रीय होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या