मुंबई, 07 मार्च : रणजी क्रिकेटचा बादशाह म्हणून ओळख असलेल्या वसीम जाफर या माजी क्रिकेटपटूने आज निवृत्ती जाहीर केली केली. जाफरने भारताकडून 31 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहे. जाफर हा घरेलु क्रिकेटमधला दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जाते. जाफरनं आपल्या करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. जाफरने तब्बल 260 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात 50.67च्या सरासरीने 19 हजार 410 धावा केल्या आहेत. त्यानं तब्बल 57 शतक लगावले आहेत. तर, लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 118 डावांमध्ये 44.08च्या सरासरीने 4849 धावा केल्या आहेत. यात 10 शतकांचा समावेश आहे. याचबरोबर जाफरने 23 टी-20 सामनेही खेळले आहेत. यात 616 धावा केल्या आहेत. मुंबईच्या या खेळाडूने 2000 ते 2008मध्ये एकूण 31 कसोटी सामने खेळले.
निवृत्तीनंतर चाहत्यांचे मानले आभार निवृत्ती जाहीर केल्यानंतर वसीम जाफरने चाहत्यांसाठी आणि त्याच्या जवळच्यांसाठी एक खास संदेश शेअर केला. त्याने लिहिले की, ‘अल्लाहचा मी आभारी आहे की त्याने मला हा सुंदर खेळ खेळण्याचे कौशल्य दिले. मी माझे कुटुंब, पालक आणि भाऊ यांचे आभार मानतो ज्याने मला मदत केली. माझ्याबरोबर राहण्यासाठी इंग्लंड सोडून माझ्यासोबत राहण्यासाठी आलेल्या माझ्या कुटुंबाचा मी ऋणी आहे”. जाफर हे अंडर-19 वर्ल्ड कप संघाचे फलंदाजी कोचही होते. त्यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर भारतानं फायनलपर्यंत मजल मारली. जाफरच्या कारकीर्दीचा अविस्मरणीय क्षण त्याच्या कारकीर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणे असे वसीम जाफरने सांगितले. जाफरने पाकिस्तानविरुध्द 202 डाव आणि वेस्ट इंडिजविरूद्ध 212 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, सेहवाग, लक्ष्मण आणि एमएस धोनी या दिग्गजांसह त्याने ड्रेसिंग रूम शेअर केली, याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, सचिन हा माझा रोल मॉडेल असल्याचे त्याने सांगितले.