virat kohli lbw
दिल्ली, 18 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतत सुरू आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने २६२ धावात रोखून पहिल्या डावात १ धावेची आघाडी मिळवली. भारतीय संघाने १०० धावांच्या आतच पाच विकेट गमावल्या होत्या. नाथन लायनला गेल्या सामन्यात फारशी कमाल दाखवता आली नव्हती. मात्र आजच्या सामन्यात त्याने पाच गडी बाद केले. भारताचे आघाडीचे फलंदाज लागोपाठ बाद होत असताना एका बाजूने विराट कोहली मैदानात तळ ठोकून होता. विराट अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना तो पायचित झाला. पंचांच्या या निर्णयावर विराटसह प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही ड्रेसिंग रूममध्ये नाराजी व्यक्त केल्याचं दिसलं. मॅथ्यू कुह्नेमनच्या गोलंदाजीवर विराटने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पंच नितिन मेनन यांनी त्याला बाद दिलं. विराटने रिव्ह्यू घेतला पण तिसऱ्या पंचांनाही याबाबत स्पष्ट काही दिसलं नाही. त्यामुळे मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान, तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू पाहिला तेव्हा चेंडू बॅट आणि पॅड दोन्हीला एकाचवेळी लागताना दिसला. विराटनेसुद्धा पंचांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचं दिसलं. हेही वाचा : विराट अन् पंच नितिन मेनन यांच्यात आहे ३६चा आकडा, आधीही दिलेत वादग्रस्त निर्णय आयसीसीचा नियम काय सांगतो? चेंडू बॅट आणि पॅडवर एकाच वेळी लागला तर अशा स्थितीत चेंडू पहिल्यांदा बॅटला लागला असे मानले जाईल. जर चेंडू बॅट आणि पॅडला एकाच वेळी लागला असं समजल्यास विराट कोहली नाबाद ठरतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट बाद झाल्यानंतर भारताचा डाव अष्टपैलू क्रिकेटर अक्षर पटेल आणि अश्विन यांनी सावरला. दोघांनी शतकी भागिदारी करत संघाच्या अडीचशे धावा धावफलकावर लावल्या. अक्षर पटेलने ७४ धावांची खेळी केली.