JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कोहलीच्या विकेटवरून वाद? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, विराटची रिएक्शन व्हायरल

कोहलीच्या विकेटवरून वाद? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, विराटची रिएक्शन व्हायरल

विराट कोहली कुह्नेमनने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर पायचित झाला. तेव्हा चेंडू विराटची बॅट आणि पॅड या दोन्हीच्या बरोबर मधे होता

जाहिरात

virat kohli lbw

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 18 फेब्रुवारी : प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारताची अवस्था बिकट झाली आहे. भारताचे १५४ धावात ७ गडी बाद झाले आहेत. दिवसाच्या सुरुवातीला कालच्या बिनबाद ३७ वरून डाव सुरू झाल्यानतंर केएल राहुल लवकर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा बोल्ड झाला. तर शंभरावी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजारा शून्यावर तंबूत परतला. सूर्यकुमार यादवच्या जागी संघात स्थान मिळालेल्या श्रेयस अय्यरला फक्त चार धावा करता आल्या. यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी मोठी भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाची विकेट घेत मर्फीने ही जोडी फोडली. त्यांतर विराट कोहली बाद झाला तर यष्टीरक्षक एस भरत फक्त ६ धावाच करू शकला. विराट कोहली पायचित बाद झाला. रिप्लेमध्ये चेंडू आधी बॅटला लागल्यासारखं दिसत होतं. पण मैदानी पंचांसह तिसऱ्या पंचांनीही बाद असल्याचा निर्णय दिला. हेही वाचा :  Prithvi Shaw Car Attack : पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या २ आरोपींना अटक विराट कोहली कुह्नेमनने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर पायचित झाला. तेव्हा चेंडू विराटची बॅट आणि पॅड या दोन्हीच्या बरोबर मधे होता. त्यामुळे चेंडू आधी बॅटला लागला की पॅडला लागला हे स्पष्ट कळत नव्हते.

संबंधित बातम्या

रिव्ह्यूमध्ये चेंडू आधी बॅटला लागल्यासारखं दिसतं. याआधीही तो श्रीलंकेविरुद्ध गेल्या वर्षी झालेल्या मालिकेत असाच बाद झाला होता. विराट कोहली बाद झाल्यानं भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. विराटने ८४ चेंडू खेळताना ४४ धावा केल्या. यात त्याने ४ चौकार मारले. त्याने रविंद्र जडेजासोबत ५९ धावांची भागिदारी केली होती. पण जडेजा बाद झाल्यानंतर दहा धावांची भर घालून विराट तर त्यानंतर पुढच्याच षटकात एस भरत बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने ४१ धावा देत भारताचे पाच गडी बाद केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या