JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs AUS : विराटच्या आजारपणाच कारण आलं समोर! सह खेळाडूच्या पत्नीने केला खुलासा

IND vs AUS : विराटच्या आजारपणाच कारण आलं समोर! सह खेळाडूच्या पत्नीने केला खुलासा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी, विराटने आजारी असताना देखील देशासाठी तब्बल 8 तास 40 मिनिटे फलंदाजी करताना आपला सर्वात्तम खेळ दाखवून संघासाठी मोलाची कामगिरी केली.

जाहिरात

विराटच्या आजारपणाच कारण आलं समोर! सह खेळाडूच्या पत्नीने केला खुलासा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मार्च : अहमदाबाद येथे सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी विराटने भारतासाठी अशक्य वाटणारे आव्हान पूर्ण करून भारताला सामन्यात आघाडी मिळून दिली. विराटने तब्बल 8 तास 40 मिनिटे फलंदाजी करताना  186 धावा करून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 75 वे शतक देखील ठोकले आहे. विशेष म्हणजे विराटने आजारी असताना देखील देशासाठी आपला सर्वात्तम खेळ दाखवून संघासाठी मोलाची कामगिरी केली. विराटने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध झुंजार खेळी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याने 75 वे तर कसोटी क्रिकेटमधील त्याचे 28 वे शतक पूर्ण केले. 2019 नंतरच्या  प्रदीर्घ काळानंतर विराटच्या बॅटमधून कसोटी क्रिकेटमध्ये हे शतक निघाले. परंतु ही जबरदस्त खेळी करताना विराट कोहली हा आजारी होता याची कोणाला शंका देखील आली नाही. विराटच्या शतकानंतर पत्नी अनुष्काने सोशल मिडीआयवर पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या, परंतु त्यात तिने विराटसाठी लिहिलेला संदेश पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. यात तिने विराटच्या तब्बेती विषयी खुलासा करून “अशा प्रकारे शांततेने आजारपणातही तुझे खेळणे. मला नेहमी प्रेरणा देते.” असे लिहिले होते. अनुष्काच्या पोस्टमधून त्याच्या चाहत्यांना तो आजारी असल्याचे कळाले परंतु विराटला नेमकं काय झालं होत? याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही. परंतु आता विराटच्या सह खेळाडुच्या पत्नीने याबाबत खुलासा केला आहे.

भारताचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन याची पत्नी प्रीति नारायणने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत विराटच्या तब्बेतीबाबत खुलासा केला.  विराट तापाने फणफणला होता आणि तरीही तो मैदानावर 8 तास 40 मिनिटे खेळत राहिला. आजारपणातही विराटने देशासाठी केलेल्या या झुंजार खेळीमुळे त्याच्या चाहत्यांना विराटचा आता अधिक अभिमान वाटू लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या