विराट अनुष्का किर्तनात दंग
लंडन, 18 जून : भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली पत्नी अनुष्कासह सध्या लंडनमध्ये सुट्टी साजरी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर आता भारतीय खेळाडूंना मोठा ब्रेक मिळाला आहे. यामुळे अनेक खेळाडू सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये लंडनमध्ये ते कृष्णा दास यांच्या कीर्तन कार्यक्रमात उपस्थित राहिल्याचं दिसतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे उपस्थितांमध्ये बसून कीर्तन ऐकताना दिसतात. कृष्णा दास हे अमेरिकन वोकलिस्ट आहेत. भक्तीसंगीतासाठी ते प्रसिद्ध आहेत. गेल्या ४० वर्षांपासून ते कीर्तन करत असून जगभरात यासाठी त्यांना ओळखलं जातं. विराट आणि अनुष्का याआधी अनेक धार्मिक ठिकाणी गेल्याचं दिसलं आहे. याआधी उज्जैनच्या महाकाल दर्शनासाठी गेले होते. त्यानतंर वृंदावनातही गेले होते. स्टोक्सने स्मिथसाठी लावली ‘स्पेशल फिल्डिंग’, इंग्लंडने 59 चेंडूत दिली नाही एकही संधी
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अद्याप भारतीय संघ जाहीर झालेला नाही. या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. यात यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांचा समावेश होऊ शकतो. बीसीसीआय विराट, रोहित या खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून हे खेळाडू सलग खेळत आहेत. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी 12 जुलै रोजी विंडसर पार्कवर होणार आहे. यानंतर भारत आशिया कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान आशिया कम स्पर्धेत एकाच ग्रुपमध्ये आहेत. गेल्या वेळी भारताने पाकिस्तानला 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये हरवलं होतं. त्या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली होती.