JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / प्रेम, ब्रेकअप ते आता आई-बाबा! वाचा आदर्श कपल असलेल्या 'विरुष्का'ची Lovestory

प्रेम, ब्रेकअप ते आता आई-बाबा! वाचा आदर्श कपल असलेल्या 'विरुष्का'ची Lovestory

आदर्श कपल असलेल्या विराट-अनुष्काचंही ‘या’ कारणामुळे होणार होतं ब्रेकअप.

0110

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आदर्श कपल मानले जातात. नुकताच विराटनं एक फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली, आणि जानेवारी 2021ला नवा पाहुणा घरी येणार असल्याचे सांगितले.

जाहिरात
0210

लाडके विरुष्का आई-बाबा होणार असल्याचे कळल्यानंतर चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. काही क्षणात सोशल मीडियावर विरुष्का ट्रेंड पाहायला मिळाला, आणि दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला.

जाहिरात
0310

मात्र विरुष्कानं आपल्या प्रवासात अनेक उतार चढाव पाहिले. 2013मध्ये अनुष्का आणि विराटची एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान पहिली मुलाखत झाली. त्यावेळी दोघंही आपआपल्या क्षेत्रात चांगल्या फॉर्ममध्ये होते.

जाहिरात
0410

शूटनंतर अनेकदा दोघांना एकत्र पाहिले गेले. मात्र आपण केवळ मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र 2014च्या दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर विराट थेट अनुष्काच्या घरी गेला.

जाहिरात
0510

अनुष्काही 2014मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात विराटला सपोर्ट करताना दिसून आली. त्यानंतर श्रीलंकाविरुद्ध झालेल्या मालिकेत शतकी खेळी केल्यानंतर विराटनं अनुष्काला फ्लाइंग किस दिले, आणि ही जोडी चर्चेत आली.

जाहिरात
0610

त्यानंतर प्रत्येक सामन्यादरम्यान अनुष्का-विराटला सपोर्ट करताना दिसली. मात्र दोघांनाही अनेक टीकांचाही सामना करण्यात आला. 2014मध्ये जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, तेव्हा विराट कोहली फॉर्ममध्ये नव्हता. यादरम्यान अनुष्का शर्मावर टीका करण्यात आली.

जाहिरात
0710

त्यानंतर 2016मध्ये टी-20 वर्ल्ड कपदरम्यानही चाहत्यांनी अनुष्काला टार्गेट केल्यानंतर विराटनं अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत तिचे समर्थन केले.

जाहिरात
0810

मात्र त्यानंतर विराट कोहलीनं Heartbroken असे कॅप्शन टाकत एक फोटो शेअर केला होता. हा फोटोनंतर डिलीट करण्यात आला. त्यावेळी विराट-अनुष्काचं ब्रेकअप झाले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

जाहिरात
0910

मात्र त्यानंतर विराट आणि अनुष्काची लव्हस्टोरी पुन्हा ट्रॅकवर आली. त्यानंतर डिसेंबर 2017मध्ये इटलीमधील टस्कनी शहरातील बोर्गो फिनोशिटो रिसोर्टमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह झाला. त्यानंतर दिल्लीत रिसेप्शन आणि मुंबईत एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात
1010

आता लग्नाच्या तीन वर्षानंतर विराट आणि अनुष्कानं चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. विराटनं ट्विटवर एक फोटो शेअर करत, आम्ही आता Then, we were three! असे कॅप्शन देत. जानेवारी 2021 ला नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या