JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / शाहरुखच्या 'कॅप्टन' ठरला लकी; त्याच्यामुळे 'या' खेळाडूलाही मिळालं वर्ल्ड कपचं तिकीट

शाहरुखच्या 'कॅप्टन' ठरला लकी; त्याच्यामुळे 'या' खेळाडूलाही मिळालं वर्ल्ड कपचं तिकीट

आगामी वर्ल्डकरसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. त्यात या अष्टपैलू खेळाडूला जागा मिळाली आहे. तो भारतीय संघात दिसला नसता, जर काही महिन्यांपूर्वी त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याला या दुसऱ्या खेळाडूनं वाचवलं नसतं. सध्या शाहरुख खानच्या IPL संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू कसा ठरला तारणहार?

0110

वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ जाहीर झाला. त्यात विजय शंकरला स्थान मिळालं आहे. 9 वन डे खेळलेल्या विजय शंकरची वर्णी यात लागली.

जाहिरात
0210

विजय शंकर हा अष्टपैलू खेळाडू काही महिन्यांपूर्वी करिअर संपून घरी बसायच्या बेतात होता.

जाहिरात
0310

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय शंकरने फक्त 41 बॉलमध्ये 46 धावा केल्या. त्यात त्याने 5 चौकार आणि एका षटकाराची बरसात केली.

जाहिरात
0410

46 धावा करून अगदी थोडक्यात तो धावबाद झाला. त्याचं हे बाद होणं त्याच्या वाढत्या चाहत्या वर्गाला अगदी चटका लावून गेलं. पण या अष्टपैलू खेळाडूविषयी एक गोष्ट माहीत आहे का...

जाहिरात
0510

पण विजय शंकरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर त्याचं करिअर संपलं असतं जर दिनेश कार्तिक त्याच्या मदतीला धावला नसता....

जाहिरात
0610

गेल्या वर्षी या खेळाडूच्या क्षमतेवर प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. मार्च २०१८ मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या निधास चषकाच्या अंतिम सामन्यात विजय शंकरच्या संथ फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. मात्र दिनेश कार्तिकच्या तुफानी खेळीमुळे भारताला रोमहर्षक विजय मिळाला.

जाहिरात
0710

निधान ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजयने १९ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या. जेव्हा संघाला जलद धावा करण्याची गरज होती, तेव्हा तो मोठा शॉट मारण्याच्या नादात बाद झाला.

जाहिरात
0810

या सामन्यात शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. मात्र विजय शंकरमुळे टीम इंडियाने पहिल्या पाच चेंडूत पाच धावाच केल्या.

जाहिरात
0910

शेवटच्या चेंडूत भारतीय संघाला सहा धावांची गरज होती. टीम इंडियाच्या हातून हा सामना गेला असं वाटत असताना, दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला चार गडी राखून सामना जिंकून दिला. जर टीम इंडियाने हा सामना हरला असता तर विजया करिअरला ग्रहण लागलं असतं.

जाहिरात
1010

आता टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने विजय शंकरवर विश्वास दाखवला आणि त्याला मेलबर्नमध्ये टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या