विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) क्वार्टर फायनलमध्ये केरळविरुद्ध कर्नाटकचा (Kerala vs Karnataka) कर्णधार रवीकुमार समर्थने (Ravikumar Samarth) 192 रन केले.
विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये कर्नाटकच्या बॅट्लमननी केरळच्या बॉलिंगची धुलाई केली. पहिले बॅटिंग करताना कर्नाटकने 50 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 338 रन केले. कर्नाटककडून देवदत्त पडिक्कलने 119 बॉलमध्ये 101 रनची खेळी केली. तर कर्णधार रवीकुमार समर्थने 192 रन केले.
समर्थच्या या वादळी खेळीमध्ये 22 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. 121.52 च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. समर्थने पडिक्कलसोबत पहिल्या विकेटसाठी 249 रनची पार्टनरशीप केली.
रवीकुमार समर्थकडे सहज द्विशतक करण्याची संधी होती, पण 49 व्या ओव्हरमध्ये एनपी बसिलच्या बॉलिंगवर तो आऊट झाला. 192 रन हा समर्थचा लिस्ट ए करियरमधला सर्वाधिक स्कोअर आहे.
रवीकुमार समर्थही राहुल द्रविडचाच शिष्य आहे. राहुल द्रविड इंडिया एचा कोच होता तेव्हा समर्थही त्या टीममध्ये होता. समर्थने इंडिया एसाठी इंग्लंड दौऱ्यात 137 रनची शतकी खेळी केली होती. न्यूझीलंड ए दौऱ्यातही समर्थने नाबाद 50 रन करून मॅच ड्रॉ केली होती.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये समर्थने आतापर्यंत 600 रन केले आहेत. यात 3 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत त्याने 150 पेक्षा जास्तच्या सरासरीने रन केले आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये यंदाच्या मोसमात सर्वाधिक रन करण्याच्या स्पर्धेत समर्थच्या पुढे देवदत्त पडिक्कल आहे. पडिक्कलने 4 शतकांच्या मदतीने 673 रन केल्या आहेत.