JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विजय माल्याने RCBची खिल्ली उडवत म्हटलं,'विराटला सोडा...'

विजय माल्याने RCBची खिल्ली उडवत म्हटलं,'विराटला सोडा...'

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएलच्या नव्या हंगामासाठी लोगोपासून जर्सीपर्यंत अनेक बदल केले आहेत. संघाच्या या निर्णयावर आरसीबीचे सुरुवातीचे मालक विजय मल्ल्या यांनी पहिल्यांदा खिल्ली उडवली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : आयपीएलच्या 13 व्या हंगामाची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. फक्त काही महिने बाकी राहिले आहेत. लिलावानंतर संघ तयारीला लागले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएलच्या या हंगामासाठी लोगोपासून जर्सीपर्यंत अनेक बदल केले आहेत. संघाच्या या निर्णयावर आरसीबीचे सुरुवातीचे मालक विजय मल्ल्या यांनी पहिल्यांदा खिल्ली उडवली. त्यांनी ट्विट करून म्हटलं की, ट्रॉफीसुद्धा जिंका. चाहते त्या क्षणाची वाट बघत आहेत. आरसीबीला आजपर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेलं नाही. माल्ल्या यांनी म्हटलं की, विराट कोहली अंडर 19 संघातून आरसीबीमध्ये आला होता. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यशाची अनेक शिखरं गाठली. त्यानंही सर्वोत्तम कामगिरी केली. आता कोहलीला सोडा म्हणजे त्याला स्वातंत्र्य द्या. आरसीबीचे सर्व चाहते ट्रॉफीची वाट बघत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे या हंगामाचे स्पॉन्सर मुथुट फिनकॉर्प हे आहेत. यामुळे संघाने लोगोमध्ये बदल केला आहे. शुक्रवारी लोगोचे अनावरण करण्यात आले. आरसीबीने म्हटलं की, तुम्हाला ज्याची प्रतिक्षा होती ते हे आहे. नवं दशक, नवीन आरसीबी आणि नवा लोगो. आरसीबीचे चेअरमन संजीव चूडीवाला यांनी सांगितलं की, दोन पायांवर उभा असलेल्या सिहांचे शाही परिवारात पुनरागमन झालं. आयपीएलचा 13 वा हंगाम आहे आणि आरसीबी आजपर्यंत एकदाही विजेतेपद जिंकू शकलेलं नाही. आतापर्यंत त्यांनी तीनवेळा लोगो बदलला आहे. लोगो बदलल्यानंतर आरसीबीने संघाची नवी जर्सी लाँच केली आहे. विराट कोहलीने नवीन लोगो अनावरण केल्यनंतर हिंदी गाण्याची एक लाइन ट्विट केली होती. विराट म्हणाला होता की, लोगो का काम है कहना. आरसीबीचा नवा लोगो पाहून छान वाटलं. यामध्ये स्पिरीट आहे आणि खेळाडू याच उत्साहाने मैदानावर उतरतात. आयपीएल 2020 ची उत्सुकता लागल्याचंही विराट म्हणाला. वाचा : अखेर झाली धोनीच्या कमबॅकची घोषणा, CSKने शेअर केला खास VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या